- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: तालुक्यातील निमकोहळा-काळेगाव येथील निम्न ज्ञानगंगा प्रकल्पाला निकृष्ट दर्जाचे ग्रहण लागल्याचे दिसून येते. परिणामी, प्रकल्प पूर्णत्वास येण्यापूर्वीच या प्रकल्पाच्या भींतीला तडे जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आर्हे. काळ्या मातीऐवजी पांढरीमाती, दगड आणि झाडांच्या मुळांची छानणी न करताच प्रकल्पात टाकल्यात आल्याने, या प्रकल्पाच्या दर्जाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्या जात आहे.विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर अंतर्गत खामगाव तालुक्यात रोहणा परिसरात निम्न ज्ञानगंगा-२ बृहत लघू पाटबंधारे प्रकल्प पूर्णत्वास जात आहे. या प्रकल्पामुळे तालुक्यातील विविध गावांमधील तब्बल १ हजार १८१ जमिन सिंचनाखाली आणण्यास भविष्यात मदत होईल. मात्र, सुरूवातीच्या काळात भुसंपादन आणि त्यानंतर मोबदल्यावरून रखडलेला हा महत्कांक्षी प्रकल्प आता निकृष्ट दर्जाच्या कचाट्यात सापडल्याचे दिसून येते. पूर्णपणे काळ्या मातीचा वापर करण्याऐवजी खडकाळ आणि दगड मिश्रीत मातीचा यामध्ये वापर करण्यात आल्याने, प्रकल्प पूर्णत्वास जाण्यापूर्वीच प्रकल्पाच्या भींतीवर तडे जात आहेत. काही ठिकाणी या प्रकल्पाच्या भींतीवर लावण्यात आलेले दगडही घसरले आहे. तसेच कॅनालचे बांधकाम करताना त्याच्या दर्जाकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्याने, हे कॅनाल कितीकाळ तग धरतील? असाही प्रश्न शेतकरीवर्गात उपस्थित होत आहे.
निम्न ज्ञानगंगा प्रकल्पाच्या कामास निकृष्टतेचे ग्रहण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 16:07 IST