प्रेमी युगुल सोनाळ्यात परतले!

By Admin | Updated: June 7, 2017 00:02 IST2017-06-07T00:02:21+5:302017-06-07T00:02:21+5:30

सोनाळा : टुनकी गावातून गावकऱ्यांनी पिटाळून लावलेले ते प्रेमी युगुल सोनाळ्यात आश्रयाला आले; मात्र येथेही त्यांच्यावर गाशा गुंडाळण्याची वेळ आली आहे.

Lover jumbo returned to gold! | प्रेमी युगुल सोनाळ्यात परतले!

प्रेमी युगुल सोनाळ्यात परतले!

सोनाळा : टुनकी गावातून गावकऱ्यांनी पिटाळून लावलेले ते प्रेमी युगुल सोनाळ्यात आश्रयाला आले; मात्र येथेही त्यांच्यावर गाशा गुंडाळण्याची वेळ आली आहे.
स्थानिक ५२ वर्षीय कर्मचाऱ्याचे २४ वर्षीय तरुणीसोबत सूत जुळले. यामध्ये तरुणी गर्भवती राहिली. दरम्यान, तो मी नव्हेच, असा पवित्रा त्या कर्मचाऱ्याने घेतल्याने तरुणीचे पित्त खवळले. तिने दहा लाखांची मागणी करीत ५२ वर्षीय कर्मचाऱ्याशी प्रेमविवाह न्यायालयात उरकून घेतला.
गावात न राहता टुनकी येथे राहावयास गेलेल्या त्या प्रेमी युगुलाला गावकऱ्यांनी पिटाळून लावले. तद्नंतर त्यांनी जळगाव गाठले तेथेही त्यांचा जम बसला नाही. अखेर त्यांनी सोनाळा गाठले असून, कर्मचाऱ्याच्या राहत्या घरापासून हाकेच्या अंतरावर ते प्रेमी युगुल एका धार्मिक स्थळाच्या ठिकाणी भाड्याने खोली घेऊन राहत आहेत. दरम्यान, या जोडप्याला आश्रयाबद्दल जाब विचारत आहेत. यामुळेही त्या प्रेमी युगुलांना या वॉर्डातूनही आपला गाशा गुंडाळावा लागणार आहे. या प्रेमी युगुलाबद्दल तर्क-वितर्क केल्या जात आहे.

दुसरेही प्रेमी युगुल होणार चतुर्भुज!
३ मे रोजी रात्री १ च्या दरम्यान मोटारसायकलने धूम ठोकलेले ते प्रेमी युगुल अखेर गावात परतले आहे. पळून गेलेल्या प्रेमी युगुलांच्या शोधार्थ दोघांच्या कुटुंबांनी शोधाशोध करीत दोघांना हुडकून काढले. खामगाववरून घरी आणले. विवाहाच्या रेशीम गाठी बांधण्याची त्यांना अट दिली. त्यामुळे दुसरेही प्रेमी युगुल लवकरच चतुर्भुज होणार असल्याचे बोलल्या जात आहे.

Web Title: Lover jumbo returned to gold!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.