चिखलाने माखलेल्या रस्त्यावर लोटांगण आंदोलन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 17:53 IST2021-09-02T17:53:41+5:302021-09-02T17:53:57+5:30
Khamgaon News : वारंवार तक्रार केल्यानंतरही काहीच उपयोग न झाल्याने गुरूवारी चक्क चिखलाने माखलेल्या रस्त्यावर लोटांगण आंदोलन करीत प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.

चिखलाने माखलेल्या रस्त्यावर लोटांगण आंदोलन!
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: स्थानिक बर्डेप्लॉट भागातील बिलाल मशीदीजवळील रस्त्याची अतिशय दयनिय अवस्था झाली आहे. याबाबत नगर पालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रार केल्यानंतरही काहीच उपयोग न झाल्याने गुरूवारी चक्क चिखलाने माखलेल्या रस्त्यावर लोटांगण आंदोलन करीत प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.
खामगाव शहरातील बर्डेप्लॉट भागातील बिलाल मशीदीला जोडणाºया रस्त्यावर आणि गल्लीम मोठ्या प्रमाणात चिखल साचला आहे. त्यामुळे परिसरातील रहिवासी आणि मशीदीत नमाजसाठी जाणाºया मुस्लिम बांधवांना त्रास सहन करावा लागतो. नगर पालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रार केल्यानंतरही रस्त्याच्या अवस्थेत बदल झाला नाही. त्याचवेळी निवेदन देऊनही साधा मुरूमही या रस्त्यावर टाकण्यात आला नाही. याबाबीचा निषेध म्हणून एआयएमआयएमचे शहराध्यक्ष मो. आरीफ अ. लतिफ यांनी गुरूवारी चक्क चिखलाने माखलेल्या रस्त्यावरून लोटांगण घेतले. मो. आरीफ यांच्या लोटांगण आंदोलनामुळे बर्डे प्लॉट भागात एकच खळबळ उडाली होती. लोटांगण आंदोलनादरम्यान, पालिकेचा कोणताही अधिकारी परिसरात न फिरकल्याचाही यावेळी निषेध नोंदविण्यात आला. त्यानंतर बिलाल मशीदीकडे जाणारा रस्त्याचे सिमेंटीकरण करण्यासाठी निवेदन देण्यात आले.