दिव्य प्रकल्पासाठी दातृत्वाच्या मुठी सैल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2021 04:08 IST2021-07-13T04:08:23+5:302021-07-13T04:08:23+5:30

संजीवनी सेवाभावी ट्रस्ट अंतर्गत बुलडाणा पोलीस विभागातील विनोदराव नरोटे यांनी दिव्य सेवा प्रकल्पाला प्लंबिंग साहित्यच्या स्वरूपात १३ हजार ...

Loose hand of charity for divine project! | दिव्य प्रकल्पासाठी दातृत्वाच्या मुठी सैल!

दिव्य प्रकल्पासाठी दातृत्वाच्या मुठी सैल!

संजीवनी सेवाभावी ट्रस्ट अंतर्गत बुलडाणा पोलीस विभागातील विनोदराव नरोटे यांनी दिव्य सेवा प्रकल्पाला प्लंबिंग साहित्यच्या स्वरूपात १३ हजार रुपयांची मदत दिली. अरविंद रत्नपारखी आणि प्रा. गणेशराव देशमुख (अध्यक्ष संजीवनी सेवाभावी ट्रस्ट) यांच्या प्रमुख उपस्थितीत ही मदत संस्थापक अध्यक्ष अशोक काकडे यांच्या उत्स्फूर्त करण्यात आली. मेघा प्रभू झाल्टे या पती-पत्नीकडून आश्रमासाठी एलसीडी ३२ इंची भेट मिळाली आहे. इतरांकडूनही विविध साहित्य भेट मिळाले. मदतीचा ओघ हळुवार का होईना सुरूच आहे. दुसऱ्याच्या वेदना जाणणारे समाजात कमी नाहीत. त्यामुळे समाजकार्य करीत राहिले तर त्यातून मार्ग निघत जाऊन इतरांच्या वेदना कमी होत जातात.

आपली छाेटीशी मदत इतरांसाठी मायेचा आधार

अखंड कार्यमग्न समाजसेवी अशोक काकडे यांनी त्यांच्या समाजकार्यात इतरांचाही हातभार लागत असल्याने वेदनेची जाणीव असणारेदेखील समोर येत असून समाजात सकारात्मक असे काही घडत असल्याचे मत यावेळी नरोटे यांनी व्यक्त केले. आपली एक छोटीशी मदत इतरांसाठी मायेचा आधार ठरू पाहत आहे.

Web Title: Loose hand of charity for divine project!