धारातिर्थाच्या गोमुखातील धार आटण्याच्या मार्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 15:13 IST2019-05-27T15:13:48+5:302019-05-27T15:13:54+5:30
लोणार: येथील खाऱ्या पाण्याच्या सरोवर काठावर असलेल्या धार्मिकदृ्ष्ट्या महत्त्वाच्या धारातिर्थावरील गोमुखातून पडणारी पाण्याची धार आता आटण्याच्या मार्गावर आहे.

धारातिर्थाच्या गोमुखातील धार आटण्याच्या मार्गावर
लोणार: येथील खाऱ्या पाण्याच्या सरोवर काठावर असलेल्या धार्मिकदृ्ष्ट्या महत्त्वाच्या धारातिर्थावरील गोमुखातून पडणारी पाण्याची धार आता आटण्याच्या मार्गावर आहे. १९७२ च्या दुष्काळात लोणार शहराची तहान या एकमेव धारा तिर्थाने भागवली होती.
परिणाणी यंदाचा दुष्काळ किती तीव्र आहे याची कल्पना यावी मागील सतत तीन ते चार वषार्पासून जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे लोणार सरोवर परिसरातील झरेही आता आटले आहेत. त्याच्या कारणांचा शोध घेण्यासाठीही भुजल सर्व्हेक्षण यंत्रणेस नागपूर खंडपीठाने सुचीत केले आहे. मुळात या भागात आजा भूजल पातळी मोठ्या प्रमाणावर खालावली आहे. त्याचे परिणाम दृश्य स्वरुपात दिसू लागले आहेत. त्याचा परिणाम कधी काळी अखंडपणे वाहत असलेल्या या धारेवरही झाला आहे. धारातिर्थावरील गोमुखात पडणारी धार ही १९७२ च्या दुष्काळात आटली होती. त्यानंतर पुन्हा आता तशी स्थिती उद्भवत आहे. परिसरातील भूजल पातळीही घटल्याने सरोवर परिसरातील हिरवळी आता दृष्टीपथास येत नाही.दरम्यान, याचा फटका पर्यटनालाही बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. धारातिर्थाबरोबरच लिंबी बारवेतही पाणी नाही.
दुसरीकडे लोणार शहरास पाणीपुरवठा करणाºया बोरखेडी प्रकल्पातही आता ठणठणात दिसून येत आहे. लोणार शहराला एक महिन्या आड आज पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे अशा स्थितीत या धारेचा होणार लाभ कितपत होईल, याबाबत शंकाच आहे.
चार वर्षापूर्वी गोमुखात पाणी कोठून येते याचा पुरात्व विभागाच्या एका पथकाने शोध घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी आतील बाजूने जमिनीखालून एका दगडी दांडाद्वारे सुबक पद्धतीने गोमुखापर्यंत पाणी आणल्या गेल्याचे समोर आले होते. त्यामुळे गोमुखात येणाºया पाण्याचा स्त्रोतच आता आटला की काय अशी भिती व्यक्त होतेय. (शहर प्रतिनिधी)