लोणार सरोवर विकास समितीने यंत्रणांकडून मागवली माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:41 IST2021-09-08T04:41:21+5:302021-09-08T04:41:21+5:30

विभागीय आयुक्त पीयूषसिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला लोणार सरोवराशी संबंधित सर्व यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. लोणार सरोवर विकासाचा ...

Lonar Sarovar Vikas Samiti requested information from the agencies | लोणार सरोवर विकास समितीने यंत्रणांकडून मागवली माहिती

लोणार सरोवर विकास समितीने यंत्रणांकडून मागवली माहिती

विभागीय आयुक्त पीयूषसिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला लोणार सरोवराशी संबंधित सर्व यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. लोणार सरोवर विकासाचा सर्वंकष आराखडा तयार करण्याबाबत २५ ऑगस्ट रोजी नागपूर खंडपीठात झालेल्या सुनावणीदरम्यान निर्देश देण्यात आले होते. त्यानुषंगाने विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या १३ सदस्यीय समितीमधील ११ सदस्यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सर्वंकष आराखड्याच्या दृष्टीने आवश्यक ती माहिती संकलित करून सादर करण्याबाबत या बैठकीत सूचित करण्यात आलेले आहे.

--दोनपैकी एका सदस्याची नियुक्ती--

नागपूर खंडपीठाने आदेशीत केल्यानुसार या समितीवर दोन अशासकीय सदस्य घ्यावयाचे आहेत. त्यानुषंगाने समिती अध्यक्ष तथा विभागीय आयुक्ता यांना एक आणि सहअध्यक्ष, मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक मेळघाट प्रकल्प यांना एका अशासकीय सदस्याची नियुक्ती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यासंदर्भाने सहअध्यक्षांनी त्यांच्या अधिकारात किशोर विखे यांची अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती केली असल्याची माहिती अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयातील सूत्रांनी दिली आहे.

Web Title: Lonar Sarovar Vikas Samiti requested information from the agencies