लोणार सरोवराच्या तार कुंपणाने तारले!

By Admin | Updated: July 28, 2014 00:13 IST2014-07-28T00:09:18+5:302014-07-28T00:13:18+5:30

तवेरा गाडीचा अपघात, वनविभाग घटनेपासून अनभिज्ञ

Lonar lake saved by wire fencing! | लोणार सरोवराच्या तार कुंपणाने तारले!

लोणार सरोवराच्या तार कुंपणाने तारले!

लोणार : चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने तवेरा गाडीचा अपघात झाल्याची घटना शनिवारच्या रात्रीदरम्यान घडली असून, सरोवरास केलेल्या तार कुंपणामुळे क्षतीग्रस्त गाडी सरोवरात कडे लोट होता होता वाचली. सुदैवाने या अपघातात कोणतीही प्राणहाणी झाली नसुन, सरोवराच्या तार कुंपणानेच गाडीतील नागरिकांना तारले.
किन्ही ते लोणार मार्गावर असलेल्या वळणावर जालना येथील एम. एच. २१ व्ही.५२४९ क्रमांकाची तवेरा गाडी शनिवारी रात्री ११.३0 वाजेदरम्यान लोणारकडे येत होती. चालकाने मद्य प्राशन केलेले असल्यामुळे त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी तीन ते चार पलट्या खाऊन सरोवराच्या काठावर केलेल्या तार कुंपणावर जाऊन धडकली. तार कुंपण केलेले असल्यामुळे सदर गाडी दरीत कोसळली नाही. तसेच वेळीच गाडीतील नागरिकांनी बाहेर उड्या मारल्याने कोणतीही प्राणहाणी झाली नाही. यामुळे सरोवराच्या संरक्षणासाठी केलेल्या तार कुंपणाचे मोठे नुकसान झाले आहे. गाडी काढण्यासाठी जेसीबीद्वारे केलेल्या खोदकामामुळे सरोवरात घाणपाणी जाण्याची शक्यता आहे. या अपघाताबाबत वनविभागाच्या कर्मचार्‍यांना अद्याप माहिती नसल्याने सरोवराच्या सुरक्षतेसाठी कार्यरत असलेले कर्मचारी कितीदक्ष आहेत, हे समजते.

Web Title: Lonar lake saved by wire fencing!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.