लोकमतचा उपक्रम : स्पोर्टस् बुक स्पर्धा

By Admin | Updated: July 12, 2014 22:24 IST2014-07-12T22:24:58+5:302014-07-12T22:24:58+5:30

विजेत्या विद्यार्थ्यांंना बक्षीसांचे वितरण

Lokmat Program: Sports Book Competition | लोकमतचा उपक्रम : स्पोर्टस् बुक स्पर्धा

लोकमतचा उपक्रम : स्पोर्टस् बुक स्पर्धा

मलकापूर : महाराष्ट्राचा मानबिंदू असलेल्या ह्यलोकमतह्ण तर्फे घेण्यात आलेल्या स्पोटर्स बुक स्पर्धेतील विजेत्यांना नुकतेच बक्षीसांचे वितरण करण्यात आले. शहरातील स्कूल ऑफ स्कालर्स आणि यशोधाम पब्लिक स्कूल मधील विद्यार्थ्यांंना लोकमतकडून बक्षीस देण्यात आले. क्रीडा जगताची धमाल घरबसल्या अनुभवा अशी आगळी वेगळी धमाल स्पर्धा (स्पोर्टस बूक स्पर्धा ) इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांंकरीता आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून शहरातील स्कूल ऑफ स्कॉलर्स या शाळेतील श्रुती योगेश चौधरी (इयत्ता २ री) हिला प्रथम बक्षीस पियानो, द्वितीय बक्षीस (ट्रॉली बॅग ) अभिषेक ढाडे, तर तृतीय बक्षीस स्वामी नारायण फालके या विद्यार्थ्यांंला देण्यात आले. स्कूल ऑफ स्कालर्स शाळेत आयोजित बक्षीस वितरण सोहळ्याला संचालक अमर संचेती, प्राचार्या वेस्ली जॉन, उपप्राचार्य अविनाश ढाके यांच्यासह शाळेतील शिक्षक वृंद व कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Lokmat Program: Sports Book Competition