‘लोकमत’च्या महायज्ञाने ‘रक्ताचं नातं’ अधिक दृढ होणार : नगराध्यक्षा बोंद्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:22 IST2021-07-03T04:22:36+5:302021-07-03T04:22:36+5:30

लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक व ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त २ जुलै रोजी ...

'Lokmat' Mahayagya will strengthen 'blood ties': Mayor Bondre | ‘लोकमत’च्या महायज्ञाने ‘रक्ताचं नातं’ अधिक दृढ होणार : नगराध्यक्षा बोंद्रे

‘लोकमत’च्या महायज्ञाने ‘रक्ताचं नातं’ अधिक दृढ होणार : नगराध्यक्षा बोंद्रे

लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक व ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त २ जुलै रोजी लोकमत चिखली तालुका कार्यालयात अभिवादन करण्यात आले. कोरोनोच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम पाळत व मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत नगराध्यक्षा प्रिया बोंद्रे व मान्यवरांच्या हस्ते बाबूजींच्या प्रतिमेचे पूजन करून यावेळी अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख भास्करराव मोरे, श्रीराम नागरीचे अध्यक्ष तथा भाजपा शहराध्यक्ष पंडितराव देशमुख, माजी नगराध्यक्ष सलीम मेमन, युवासेना उपजिल्हाप्रमुख रोहित खेडेकर, बालरोगतज्ज्ञ डॉ. शिवशंकर खेडेकर, स्वाभिमानीचे विनायक सरनाईक, नितीन राजपूत, जय बोंद्रे, जि.प. शिक्षण समिती सदस्य प्रवीण वायाळ, ‘लोकमत’चे चिखली तालुका प्रतिनिधी सुधीर चेके पाटील, ‘लोकमत समाचार’चे तंझीम हुसैन, पत्रकार समीर शेख, बळीराम गुंजाळ उपस्थित आदी होते. सुधीर चेके पाटील यांनी प्रास्ताविक करून आभार मानले.

Web Title: 'Lokmat' Mahayagya will strengthen 'blood ties': Mayor Bondre