ग्रामस्थांनी ठोकले शाळेला कुलूप
By Admin | Updated: August 22, 2014 23:41 IST2014-08-22T23:41:53+5:302014-08-22T23:41:53+5:30
बुलडाणा तालुक्यातील धामणगाव येथील जि.प. शाळेत अपुरे शिक्षक; संतप्त गावकर्यांनी शाळेला कुलूप ठोकले.

ग्रामस्थांनी ठोकले शाळेला कुलूप
धामणगाव धाड : बुलडाणा तालुक्यात येत असलेल्या धामणगाव धाड येथील केंद्रीय जि.प. शाळेवर इयत्ता १ ते ८ वी पर्यंत वर्ग असून गेल्या दोन महिन्यापासून येथे सहा शिक्षक ८ वर्ग शिकवित आहे. शिवाय आज २२ ऑगस्ट रोजी सकाळी ११.१५ पर्यंत प्रार्थनेसाठी दोन शिक्षक हजर होते. त्यामुळे संतप्त गावकर्यांनी शाळेला कुलूप ठोकले.
२६ जून रोजी शाळा व्यवस्थापन समितीने ठराव घेऊन अंशत: बदल करुन शिक्षकांमध्ये वर्गाची अदलाबदल करण्यात आली. परंतु आज रोजी पुन्हा परिस्थिती जैसे थे झाली. त्यामुळे संताप होवून प्रभाकर पायघन, योगेश पायघन, जितेंद्र पायघन, हिरालाल बोडखे, राजू अपार, देवेंद्र पायघन, बाबूराव पायघन, संतोष काळे, रमेश सिनकर, सतिष जंजाळ, उत्तम अपार यांच्यासह ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकले.