The loaded container crushed two young bikers on roads | भरधाव टँकरने दोन तरुण दुचाकीस्वारांना चिरडले

भरधाव टँकरने दोन तरुण दुचाकीस्वारांना चिरडले

लोकमत न्यूज नेटवर्क

नांदुरा:  राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर नांदुऱ्यावरुन  नायगावकडे  जात असलेल्या दोन तरुण दुचाकीस्वारांना दि.४ ऑगस्टच्या रात्री आठ वाजे दरम्यान  एका भरधाव टँकरने चिरडल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याने नायगाव गावावर शोककळा पसरली आहे.                      याबाबत सविस्तर वृत्त असे की नायगाव येथील दोन तरुण  राजेंद्र आनंदा डांबरे वय २९ व त्याचा मोटारसायकलवर मागे बसलेला तरुन सूरज संजय इंगळे वय १९ हे त्यांची दुचाकी क्रमांक  MH 28 AW 2377 ने नायगावकडे जात असताना केदार नदीवरील पुलावर  मलकापूर वरून नांदुरा कडे येणाऱ्या टँकर क्रमांक  MP 17  HH 2251 च्या चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव व निष्काळजीपणाने चालून या दोन दुचाकीस्वारांना चिरडले . याप्रकरणी नायगाव येथील गोविंद रामभाऊ चोपडे यांच्या तक्रारीवरून नांदुरा  पोलिसांनी  टँकर क्रमांक MP 17  HH 2251 च्या चालकाविरुद्ध  विविध गुन्ह्यांची नोंद केली आहे.  नायगाव येथील दोन्ही तरुण असल्याने संपूर्ण नायगाव व परिसरावर शोककळा पसरली आहे .

Web Title: The loaded container crushed two young bikers on roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.