सात वर्षीय मुलीवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 23:50 IST2017-07-29T23:50:28+5:302017-07-29T23:50:28+5:30

little,girl,molested,buldana | सात वर्षीय मुलीवर बलात्कार

सात वर्षीय मुलीवर बलात्कार

ठळक मुद्दे शेवचिवड्याचे दिले अमिष.

लोकमत न्यूज नेटवर्क
मोताळा: शेवचिवडा खायला देऊन एका सातवर्षीय शाळकरी मुलीवर नराधमाने बलात्कार केल्याची घटना २८ जुलै रोजी दुपारी जवळा बाजार येथे घडली.
याबाबत पीडित मुलीच्या आईने बोराखेडी पो.स्टे.ला तक्रार दिली की, सातवर्षीय मुलगी गावातील शाळेत दुस-या वर्गात शिकते. २८ जुलै रोजी फिर्यादी व तिचा पती शेतात कामावर गेले होते. तर मुलगी शाळेतून आल्यानंतर घरी एकटीच होती. त्यांच्या घरातून हाकेच्या अंतरावर महादेव श्रीनाथ याचे शेवचिवड्याचे दुकान आहे.
२८ जुलै रोजी दुपारी महादेव श्रीनाथ याने मुलीला दुकानात नेऊन तिला शेवचिवडा खायला दिला व तिच्यावर बलात्कार केला. फिर्यादी शेतातून घरी आली असता मुलीने घडलेला प्रकार सांगितला. या तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी आरोपी महादेव भोनाजी श्रीनाथ याच्याविरुद्ध कलम ३७६ (२) सह लैंगिक अपराधापासून बालकाचे संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४ व ६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: little,girl,molested,buldana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.