शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

पीक विमा भरण्यासाठी तारांबळ

By admin | Updated: July 31, 2015 00:08 IST

मेहकर तालुक्यातील हजारो शेतक-यांचा पीक विमा उतरविणे बाकीच.

मेहकर (जि. बुलडाणा): पावसाच्या हुलकावणीमूळे यावर्षी खरीप हंगाम धोक्यात सापडला आहे. पावसाअभावी होणार्‍या पीक नुकसानीची भरपाई मिळावी याकरीता राष्ट्रीय पीक विमा योजनेअंतर्गत पीक विमा उतरविण्यासाठी ३१ जुलै रोजी राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये शेतकर्‍यांची तारांबळ उडाली होती. दरम्यान तालुक्यातील हजारो शेतकर्‍यांचा पीक विमा उतरविणे अद्यापही बाकीच आहे. तालुक्यात यावर्षी मृग नक्षत्रात दोन ते तीन पाऊस झाल्यानंतर पावसाने लंबी दडी दिली. पावसाच्या हुलकावणीमुळे खरीप पीक करपायला लागली आहेत. अनियमित पावसामुळे होणार्‍या पीक नुकसानीची भरपाई मिळावी याकरीता तालुक्यातील शेतकर्‍यांनी राष्ट्रीय कृषि पीक विमा योजनेत मोठय़ा प्रमाणात सहभाग घेतला. या योजनेचा विमा काढण्याची मुदत ३१ जुलैपर्यंत होती. त्यामुळे पीक विमा भरण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रीयीकृत बँकामध्ये पीक विमा भरण्यासाठी शेतकर्‍यांची एकच गर्दी पाहावयास मिळाली. परंतू, मुदत संपल्याने यावर्षी जास्तीत जास्त शेतकर्‍यांना राष्ट्रीय पीक विमा योजनेत सहभागी होता आले नाही. तालुक्यातील हजारो शेतकर्‍यांचा पीक विमा उतरविणे अद्याप बाकी असल्यामुळे शेतकरी राष्ट्रीय पीक विम्यापासून वंचित राहणार असल्याने पीक विम्याची तारीख वाढवून मिळावी, अशी मागणी शेतकर्‍यांमधून होत आहे. गतवर्षी बुलडाणा जिल्ह्यातील १ लाख ७५ हजार ४१६ शेतकर्‍यांनी १ लाख २९ हजार ७0 हेक्टर क्षेत्रासाठी विमा काढला होता. त्यासाठी ५ कोटी १५ लाख ३३ हजार रुपये हप्ता शेतकर्‍यांनी भरला. परंतू, पीक विम्याचा लाभ अद्यापपर्यंत अनेक शेतकर्‍यांना मिळाला नसल्याने शेतकर्‍यांना गतवर्षीच्या पीक विम्याची प्रतीक्षा लागली आहे.