विहिरित पडून बिबट्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 11:24 IST2021-01-01T11:20:04+5:302021-01-01T11:24:00+5:30

बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना ३१ डिसेंबर रोजी सकाळी जनुना शिवारात उघडकीस आली.

Leopard dies after falling into a well | विहिरित पडून बिबट्याचा मृत्यू

विहिरित पडून बिबट्याचा मृत्यू

ठळक मुद्देबिबट ४० फूट खोल विहिरीत पडले.त्यामध्ये बिबटचा मृत्यू झाला.

बुलडाणा: माकडाचा पाठलाग करताना विहिरित पडून बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना ३१ डिसेंबर रोजी सकाळी जनुना शिवारात उघडकीस आली. दोन वर्षीय मादी बिबट माकडाचा पाठलाग करत असताना बुलडाणा तालुक्यातील जनुना शिवारात पंडित यशवंता नरोटे यांच्या गट नंबर ११८ मधील ४० फूट खोल विहिरीत पडले. त्यामध्ये बिबटचा मृत्यू झाला. यासंदर्भात जनुना वन समिती अध्यक्ष रामकिशन राजपूत यांनी आज ३१ डिसेंबर रोजी सकाळी बुलडाणा वन विभागाला माहिती दिली. दरम्यान, एसीएफ रंजीत गायकवाड, बुलडाणा आरएफओ गणेश टेकाळे, वनपाल सुधीर आंबेकर, वनरक्षक समाधान मांटे, कैलास कराड, पोलिस पाटील प्रमोद ढोमने हे घटनास्थळी पोहोचले. 

Web Title: Leopard dies after falling into a well