पोरज शिवारात धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 11:20 IST2019-07-14T11:18:15+5:302019-07-14T11:20:43+5:30

खामगाव: तालुक्यातील पोरं सुरज शिवारात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्यास जेरबंद करण्यास  शनिवारी रात्री वनविभागाला यश आले.

The leopard caught in Khamgaon | पोरज शिवारात धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद 

पोरज शिवारात धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद 

ठळक मुद्देखोऱ्यात दिसलेला बिबट्या पकडण्यासाठी वनविभागाने शर्थीचे प्रयत्न केले. त्यानंतर रात्री उशिरा हा बिबट्या पकडण्यात आला. पोरज, पिंपळगाव राजा परिसरात या बिबट्याने धुमाकूळ घातला होता.

लोकमत न्युज नेटवर्क
खामगाव: तालुक्यातील पोरं सुरज शिवारात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्यास जेरबंद करण्यास  शनिवारी रात्री वनविभागाला यश आले. दुपारी ज्ञानगंगा नदीच्या खोऱ्यात दिसलेला बिबट्या पकडण्यासाठी वनविभागाने शर्थीचे प्रयत्न केले. त्यानंतर रात्री उशिरा हा बिबट्या पकडण्यात आला.    गत काही दिवसापासून पोरज आणि निमकवळा, काळेगाव, ढोरपगाव, भालेगाव बाजार,पिंपळगाव राजा परिसरात या बिबट्याने धुमाकूळ घातला होता. आतापर्यंत सहा जणांना जखमी केले होते. त्यामुळे परिसरात बिबट्याची दहशत पसरली होती. दरम्यान शनिवारी दुपारी हा बिबट्या ज्ञानगंगा नदीच्या खोऱ्यात दडून बसल्याचे एका गुराख्याला दिसले. त्याने वन आणि पोलीस विभागाला माहिती दिल्यानंतर गावकर्यां सह वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तळ ठोकून हा बिबट्याला जेरबंद केले.

Web Title: The leopard caught in Khamgaon