मोहज शिवारात बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ला

By संदीप वानखेडे | Updated: June 3, 2024 12:47 IST2024-06-03T12:46:26+5:302024-06-03T12:47:00+5:30

दाेन शेळ्या, एका कुत्र्याची केली शिकार : जखमी शेतकऱ्यावर उपचार सुरू

leopard attack on farmer in mohaj shivar | मोहज शिवारात बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ला

मोहज शिवारात बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ला

संदीप वानखडे, रुईखेड मायंबा : परिसरातील माेहज मायंबा येथे शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला, तसेच दाेन शेळ्या आणि एका कुत्र्याची शिकार केली. ही घटना २ जून राेजी रात्री घडली. जखमी शेतकऱ्यावर धाड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शेतकऱ्याची प्रकृती सध्या स्थिर आहे.
मोहोज मायंबा येथील शेतकरी शामराव साळवे (वय ६५) हे मोहोज शिवारातील आपल्या शेतात २ जून राेजी रात्री झोपायला गेले हाेते.

रात्री दोन वाजेदरम्यान बिबट्याने शेळीवर आणि सोबत असलेल्या कुत्र्यावर हल्ला केला. त्यांना वाचविण्यासाठी साळवे यांनी आरडाओरड केली असता त्यांच्यावरसुद्धा बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला; पण वेळीच परिसरातील लाेक त्यांच्या मदतीला धावल्याने बिबट्याने तेथून पळ काढल्याने ते सुदैवाने बचावले. मोहोज येथीलच सांडू इंगळे या शेतकऱ्याचेसुद्धा एक शेळीचे करडू बिबट्या घेऊन गेला. बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेले साळवे यांच्यावर धाड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या जंगलात पाणी नसल्याने वन्यप्राणी पाण्याच्या शाेधात गावाकडे येत आहेत. परिसरात बिबट्यांचा वावर असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या बिबट्याचा वन विभागाने बंदाेबस्त करावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

Web Title: leopard attack on farmer in mohaj shivar