नातेवाइकांना सोडायला जाणे झाले स्वस्त; रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट पुन्हा १० रुपये!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:35 IST2021-09-19T04:35:44+5:302021-09-19T04:35:44+5:30

बुलडाणा : कोरोनाकाळात रेल्वेस्थानकावर प्रवाशांची गर्दी टाळण्यासाठी प्लॅटफाॅर्म तिकीट ५० रुपये करण्यात आले होते. आता संचारबंदीत शिथिलता मिळाल्याने हे ...

Leaving relatives became cheaper; Railway platform ticket Rs 10 again! | नातेवाइकांना सोडायला जाणे झाले स्वस्त; रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट पुन्हा १० रुपये!

नातेवाइकांना सोडायला जाणे झाले स्वस्त; रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट पुन्हा १० रुपये!

बुलडाणा : कोरोनाकाळात रेल्वेस्थानकावर प्रवाशांची गर्दी टाळण्यासाठी प्लॅटफाॅर्म तिकीट ५० रुपये करण्यात आले होते. आता संचारबंदीत शिथिलता मिळाल्याने हे तिकीट पुन्हा १० रुपयांचे झाले आहे. या निर्णयामुळे नातेवाइकांना सोडायला प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या आप्तांना दिलासा मिळाला आहे.

अनलॉकच्या टप्प्यात आता रेल्वेसेवा पूर्ववत झाली आहे. दुसरीकडे पॅसेंजर रेल्वे अद्यापही बंदच आहेत. एक्स्प्रेस रेल्वे प्रवासाला प्रवाशांचा हळूहळू प्रतिसाद मिळत आहे. मुंबईकडे जाणाऱ्या एक्स्प्रेसचे आरक्षणही मिळत नसल्याची स्थिती आहे. काही मार्गावर रेल्वेची संख्याही वाढविण्यात आली आहे.

वर्षभर होता ५० रुपयांचा भुर्दंड

कोरोनापूर्वी सर्वच स्थानकांवर दहा रुपये प्लॅटफॉर्म तिकीट होते. यानंतर कोरोनाकाळात प्लॅटफॉर्मचे तिकीट ५० रुपये झाले. जवळपास वर्षभर प्रवाशांना ५० रुपयांचा भुर्दंड बसला. त्यानंतर दोन-अडीच महिन्यांपासून दहा रुपये केले आहे; मात्र याकाळात शेगाव, मलकापूर, नांदुरा या रेल्वेस्थानकावर प्लॅटफॉर्म तिकिटाच्या कमाईला फटका बसला आहे. दरवाढ होऊनही अपेक्षित कमाई होऊ शकली नाही. आता रेल्वे पुन्हा रुळावर आल्याने उत्पन्नात वाढ होत आहे.

सुरू असलेल्या रेल्वे

मुंबई - गोंदिया

मुंबई - अमरावती

कोल्हापूर - गोंदिया

मुंबई - हावडा

मुंबई - नागपूर

हावडा - पुणे

रेल्वेच्या उत्पन्नात झाली वाढ

लॉकडाऊन काळात प्लॅटफॉर्म तिकीट ५० रुपये करण्यात आले होते.

त्यामुळे तिकीट विक्री घटली होती. परिणामी, आर्थिक नुकसान वाढले होते.

आता प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री वाढल्याने रेल्वेच्या उत्पन्नात वाढ झाली आहे़

Web Title: Leaving relatives became cheaper; Railway platform ticket Rs 10 again!