अण्णाभाऊ साठे नगरात नवीन पाईपलाईन टाका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:36 IST2021-03-23T04:36:50+5:302021-03-23T04:36:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मेहकर : शहरातील अण्णाभाऊ साठे नगरातील पाणी पुरवठ्याच्या समस्या वाढल्या आहेत. या संदर्भात स्थानिक नागरिकांनी रयत ...

अण्णाभाऊ साठे नगरात नवीन पाईपलाईन टाका
लोकमत न्यूज नेटवर्क
मेहकर : शहरातील अण्णाभाऊ साठे नगरातील पाणी पुरवठ्याच्या समस्या वाढल्या आहेत. या संदर्भात स्थानिक नागरिकांनी रयत क्रांती संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष ॲड. संदीप गवई यांच्या नेतृत्वात मेहकर नगर परिषदेला निवेदन दिले.
मेहकर येथील प्रभाग क्रमांक सातमध्ये पिण्याचे पाणी येणारी पाईपलाईन ही नाल्यामधून टाकलेली आहे. या परिसरातील सांडपाणीसुद्धा याच नाल्यामधून जाते. त्यामुळे नागरिकांना पिण्यासाठी अशुद्ध पाणी मिळत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रभागात नवीन पाईपलाईन टाकून येथील नागरिकांना न्याय द्यावा, अशी मागणी ॲड. संदीप गवई यांनी नगर परिषदेकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनाची दखल घेऊन समस्या तत्काळ मार्गी लावू, असे आश्वासन मुख्याधिकारी यांनी दिले आहे. यावेळी रयत क्रांती संघटना जिल्हा उपाध्यक्ष ॲड. संदीप गवई, सुरेश दाभाडे, रमेश मानवतकर, कुणाल कटारे, सपना दाभाडे, राज कटारे, संजय मुरकुट, लताबाई मानवतकर, दीपक घुगे, शोभा गाडेकर, तुषार कटारे, शिवा मानवतकर, सत्यवान मानवतकर, लिंबाजी कटारे, अहमद कुरेशी, किशोर वानखेडे, शेख समीर, राज देशमुख, दीपक गवई, आदी नागरिक व पदाधिकारी उपस्थित होते.