भूमी अभिलेखचा गोंधळ; जिवंत वारसास दाखविले मृत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 02:05 AM2017-11-27T02:05:38+5:302017-11-27T02:07:27+5:30

वरवट बकाल : येथील स्वर्गीय पुंडलिक सोनाजी डाबरे यांचे वारस जिवंत असताना त्यांना मृत दाखविण्यात आल्याने भूमी अभिलेख कार्यालयातील सावळा गोंधळ चव्हाट्यावर आला आहे.  यामध्ये डाबरे कुटुंबीयास मनस्ताप सहन करावा लागत आहे.

Land Records Confusion; Living legends show dead! | भूमी अभिलेखचा गोंधळ; जिवंत वारसास दाखविले मृत!

भूमी अभिलेखचा गोंधळ; जिवंत वारसास दाखविले मृत!

googlenewsNext
ठळक मुद्देडाबरे कुटुंबीयांना मनस्ताप

लोकमत न्यूज नेटवर्क
वरवट बकाल : येथील स्वर्गीय पुंडलिक सोनाजी डाबरे यांचे वारस जिवंत असताना त्यांना मृत दाखविण्यात आल्याने भूमी अभिलेख कार्यालयातील सावळा गोंधळ चव्हाट्यावर आला आहे.  यामध्ये डाबरे कुटुंबीयास मनस्ताप सहन करावा लागत आहे.
पुंडलिक डाबरे यांचा मुलगा विजय पुंडलिक डाबरे यांनी आखिव पत्रिकेची मागणी संग्रामपूर येथील भूमी अभिलेख कार्यालयाकडे केली असता त्यांना सदर कागदपत्रे देण्यात आली; परंतु यावर पुंडलिक डाबरे यांचे वारस चक्क मृत असल्याचे लाल शाईने नमूद करण्यात आले आहे. हे पाहून विजय डाबरे यांना धक्काच बसला. त्यामुळे त्यांनी यासंदर्भात भूमी अभिलेख कार्यालयात तक्रार केली आहे. पुंडलिक डाबरे यांचे वारस जिवंत असताना मृत दाखविण्यात आल्याने भूमी अभिलेख कार्यालयातील सावळा गोंधळ समोर आला असून, त्याबाबत रोष व्यक्त होत आहे.  

Web Title: Land Records Confusion; Living legends show dead!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.