वसतिगृहातील स्वयंपाकी महिलेने विद्यार्थ्याच्या श्रीमुखात लगावली

By Admin | Updated: December 26, 2016 04:23 IST2016-12-26T04:23:42+5:302016-12-26T04:23:42+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहातील जेवणाच्या निकृष्ट दर्जाबद्दल विचारणा करणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या स्वयंपाकी महिलेने

The lady of the hostel took the student's head to the head | वसतिगृहातील स्वयंपाकी महिलेने विद्यार्थ्याच्या श्रीमुखात लगावली

वसतिगृहातील स्वयंपाकी महिलेने विद्यार्थ्याच्या श्रीमुखात लगावली

खामगाव (जि. बुलडाणा) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहातील जेवणाच्या निकृष्ट दर्जाबद्दल विचारणा करणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या स्वयंपाकी महिलेने श्रीमुखात लगावल्याचा प्रकार रविवारी घडला. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी जेवणावर बहिष्कार घातला.
या वसतिगृहात विद्यार्थ्यांना मेनूप्रमाणे जेवण दिले जात नाही. त्यातच दिले जाणारे जेवणही निकृष्ट दर्जाचे असल्याच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत. याच कारणावरून विद्यार्थी आणि स्वयंपाकाचा कंत्राट असलेल्या पुरवठादारांशी सतत खटके होतात. अन्नाच्या दर्जावरूनच रविवारी स्वयंपाकी महिला आणि विद्यार्थ्यांमध्ये भांडण झाले आणि त्या महिलेने एका विद्यार्थ्याच्या कानशिलात लगावली. या प्रकाराचा निषेध म्हणून, वसतीगृहातील सर्वच मुलांनी दुपारच्या जेवणावर बहिष्कार घातला. विद्यार्थ्यांनी वसतिगृहातील गृहपालाच्या कानावर हा सर्व प्रकार घातला. वसतिगृह प्रशासनाने सामोपचाराने या वादावर तोडगा काढल्याने सायंकाळी विद्यार्थ्यांनी जेवण घेतल्याचे समजते. (प्रतिनिधी)

Web Title: The lady of the hostel took the student's head to the head