शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

पाण्याच्या दीर्घकालीन नियोजनाचा अभाव;  खडकपूर्णा संघर्ष केवळ झलक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 14:38 IST

खडकपूर्णाच्या पाण्यावरून प्रादेशिक आणि स्थानिक राजकारण तापल्याच्या पृष्ठभूमीवर जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या सध्याच्या सुमारे १२ टीएमसी पाण्याच्या परिणामकारक वापरावर भर देण्याची गरज आहे.

- नीलेश जोशी

बुलडाणा : बदलते पर्जन्यमान, तापी आणि गोदावरी जलआराखड्याचा अनुषंगाने पाण्याची उपलब्धता तथा खडकपूर्णाच्या पाण्यावरून प्रादेशिक आणि स्थानिक राजकारण तापल्याच्या पृष्ठभूमीवर जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या सध्याच्या सुमारे १२ टीएमसी पाण्याच्या परिणामकारक वापरावर भर देण्याची गरज आहे. दरम्यान, जिगाव प्रकल्प पुर्णत्वास गेल्यास जिल्ह्याची महत्तम पाणीसाठवण क्षमता ही ३८ टीएमसीच्या आसपास जाईल. मात्र येत्या २० वर्षात जिल्ह्याची लोकसंख्या ३५ लाखांच्या पुढे जाण्याची शक्यता पाहता पाण्याचे पैशाच्या वापराप्रमाणेच जिल्ह्यात नियोजन अनिवार्य झाले आहे. अन्यथा प्रादेशिक तथा मतदार संघापुरता मर्यादीत असलेला आजच्या पाण्याचा संघर्ष हा अगदी गावपातळीपर्यंत पोहचण्याची साधार भीती आहे. त्यामुळे येत्या लोकसभा तथा विधानसभा निवडणुकीत पाणी उपलब्धता हा एक कळीचा मुद्दा म्हणून उभा ठाकण्याची शक्यता नाकारता येत नाही. खडकपूर्णाच्या पाण्यावरून निर्माण होऊ पाहणारा प्रादेशिक वाद तथा सिंदखेड राजा मतदार संघातील स्थानिक राजकारण्यांमधील संघर्ष ही भविष्यातील एक छोटी झलक आहे, असे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही. दोन लाख २३ हजार ४४ हेक्टर (३१) महत्तम सिंचन क्षमता असलेल्या बुलडाणा जिल्ह्यात प्रत्यक्षात आठ टक्क्यांच्या आसपास सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. त्याचा वापर किती होतो हे न बोललेले बरे. जिगावमुळे जिल्ह्याच्या पाणीसाठवण क्षमतेमध्ये २६ टीएमसीची भर पडले. मात्र या पाण्याची उपयुक्तता ही प्रामुख्याने घाटाखालील तालुक्यातच अधिक असले. त्यावेळचे चित्रही वेगळे असले. घाटावरील बुलडाणा, चिखली, सिंदखेड राजा, लोणार, देऊळगाव राजा तालुक्यांचा विचार करता या भागात उपलब्ध पाण्याचेच सुयोग्य नियोजन भविष्याच्या दृष्टीने आवश्यक आहे. खडकपूर्णा सहा टिएमसी, पेनटाकळी चार टिएमसी, कोराडी व अन्य लघू प्रकल्प मिळून जवळपास दोन टिएमसी असे पाणी उपलब्ध आहे. मात्र प्रकल्पही महत्तम क्षमतेने भरले जात नाही. त्यामुळे प्रचलीत पाणीवापराला बगल देऊन ठिबक सिंचलनाला प्राधान्य देण्याचा प्रभावी प्रयत्न या संघर्षाच्या पृष्ठभूमीवर आवश्यक झाला आहे. तशी जलजागृतीही काळाची गरज बनली असताना पीके घेण्याच्या पॅटर्नमध्ये बदलाला वाव दिल्यावा लागेल. गोदावरी जलआराखडा पूर्णत्वास गेला आहे. त्यातील पूर्णा (खडकपूर्णा) हे उपखोरे आहे. गेल्या २५ वर्षातील पावसाचे प्रमाण, वाहून जाणारे पाणी आणि पर्यावरणीय समतोल राखत प्रकल्पाखालील भागात किती पाणी गेले पाहिजे याचा अभ्यास करूनच हा आराखडा पूर्णत्वास गेला आहे. त्यातच जलयुक्त शिवारच्या कामामुळे ग्रामपातळीवरही जलसाठे निर्माण झाले आहेत. त्याचा प्रकल्पातील पाण्याच्या आवकेवरही काही प्रमाणात का होईना परिणाम झाला आहे. परिणाम स्वरुप संघर्षापेक्षा पाणीवापर नियोजनाला प्राधान्य आवश्यक झाले आहे. जलसंपदेचा प्रभावी वापर आवश्यक पश्चिम महाराष्ट्रात पाण्याची उपलब्धता अधिक असतानाही तेथे ठिबकच्या वापराला प्राधान्य दिल्या गेले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील उपलब्ध पाण्याच्या वापरालाही त्याची जोड दिल्यास शेती सिंचनासोबतच भविष्यातील जिल्ह्यातील लोकसंख्येचा पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न सुटेल. आज शहरी भागात सुमारे सहा लाख तर ग्रामीण भागात १८ लाख लोकसंख्या आहे. दर तिसर्या वर्षी अवर्षण प्रवण स्थिती जिल्ह्यात निर्माण होते. पाऊसही अपघाव पद्धतीने पडत असल्याने तोही मोठे नुकसान करत आहे. या सर्व बाबींचा मेळ घालून उपलब्ध जलसंपदेचा प्रभावी व काटकसरीने वापर आवश्यक आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhadakpurna prakalpa/sant chokhamela damखडकपूर्णा प्रकल्प/ संत चोखामेळा सागर