शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
4
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
5
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
6
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
7
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
8
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
9
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
10
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
11
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
12
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
13
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
14
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
15
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
16
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
17
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
18
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
19
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
20
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
Daily Top 2Weekly Top 5

बायोमेट्रिक यंत्रणेचा अभाव

By admin | Updated: June 2, 2015 02:23 IST

कर्मचा-यांत येईल वक्तशीरपणा; जिल्ह्यात जि.प.च्या १४४९ शाळा.

नाना हिवराळे / खामगाव: कर्मचारी व अधिकार्‍यांच्या कामात शिस्तबद्ध व वक्तशीरपणा यावा यासाठी शासकीय कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक यंत्रणा प्रणाली अमलात आली आहे; परंतु जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये अद्यापही या यंत्रणेचा अभाव दिसून येत आहे. जिल्हय़ातील १४४९ शाळांमध्ये बायामेट्रिक यंत्रणेची गरज आहे. राज्यात ई-प्रशासन अधिक सक्षम करण्यासाठी शासनाच्या प्रत्येक विभागात प्रशासकीय यंत्रणा हायटेक होत आहे. प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये काम करणारे कर्मचारी व अधिकारी वेळेवर कामावर हजर व्हावेत, याची नोंदणी होण्यासाठी बायामेट्रिक यंत्रणा (थंब) कार्यान्वित करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या जवळपास सर्वच विभागामध्ये बायोमेट्रिक यंत्रणेचा उपयोग होतो; परंतु जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये या यंत्रणेचा अभाव प्रकर्षाने दिसुन येत आहे. बुलडाणा जिल्हय़ातील तेराही तालुक्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या एकूण १४४९ शाळा आहेत. यामध्ये ३५ शाळा हायस्कूल आहेत. मराठी माध्यमांच्या प्राथमिक शाळांची संख्या ७७९ तर पूर्व माध्यमिक शाळा ५१३ आहेत. मराठी प्राथमिक शाळेवर ४ हजार ४२७ तर पूर्व माध्यमिक शाळेवर १ हजार १४७ शिक्षक कार्यरत आहेत. उपरोक्त दोन्ही शाळेवर ३६८ मुख्याध्यापक कामकाज सांभाळतात. उर्दू माध्यमाच्या प्राथमिक शाळा ६३ तर माध्यमिक ५९ शाळा आहेत. उर्दू प्राथमिक शाळेवर ४८७ शिक्षक तर माध्यमिक शाळेवर १७९ शिक्षक कार्यरत आहेत. या शाळावर ४५ मुख्याध्यापकांची पदे आहेत. ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांची शिक्षणाची अवस्था दयनीय असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. कॉन्व्हेंट संस्कृतीच्या युगात प्रत्येक पालक आपला पाल्य इंग्रजीतून शिकावा यासाठी कॉन्व्हेंटकडे धाव घेत आहेत. गावागावात आता कॉन्व्हेंट शाळांचे जाळे पसरले आहे. या वाढत्या शाळामध्ये जिल्हा परिषदेची विद्यार्थी संख्या रोडावली आहे.