दुकानांवर कामासाठी बालमजूर!
By Admin | Updated: June 7, 2017 00:15 IST2017-06-07T00:15:13+5:302017-06-07T00:15:13+5:30
विविध चौकातील चित्र : चहा टपऱ्या, वाहनदुरुस्ती व भंगार व्यवसायिकांकडे करतात काम

दुकानांवर कामासाठी बालमजूर!
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : खेळण्या - बागडण्याच्या आणि शिक्षण घेण्याच्या वयात अंगमोड मेहनत करून पोटाची खळगी भरण्यासाठी लहान मुलांना धडपड करावी लागत असल्याचे विदारक चित्र शहरातील विविध चौकामध्ये दिसत आहे. शहरातील चहाच्या टपऱ्या, वाहनदुरुस्तीचे दुकान, भेलचाटच्या गाड्यावर बरीच अल्पवयीन मुले काम करतांना लोकमतने ६ जून रोजी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये आढळून आले.
शहरात लघू व्यवसायीकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने येथे काम करण्यास कामगारांची मोठी गरज भासते. एका मजुराला सरासरी २०० ते ३०० रुपये दैनंदिन मजुरी द्यावी लागते. मात्र, त्याच ठिकाणी जर १६ वर्षांतील लहान मुल ५० ते १०० रुपय मजुरीवर काम करण्यासाठी तयार होतात. याचा फायदा घेत, शहरातील चहाच्या टपऱ्या, लोखंड भंगार व्यवसायीक व इतर लहान व्यवसायीक अश्या बालकांना कामावर ठेवतात.
उद्योगातील बालकामगारांना बाहेर काढावे, त्यांच्यासाठी शिक्षणाचा मार्ग खूला व्हावास साठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जातात. हॉटेलमध्ये काम करणारी, रस्त्यावर फिरून बूटपॉलिश करणारी, गवंड्याच्या हाताखाली काम करणाऱ्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यास शासनाला अद्यापही यश आलेले नाही. शिवाय जिल्हा कामगार विभागाचे लक्ष नसल्यामुळे शहरातील लहान मोठ्या दुकानात अल्पवयीन मुल राबतांना आढळून येतात.
चहा टपऱ्यांवर सर्वाधिक लहान मुले
शहरातील प्रत्येक चौकात व शासकीय कार्यालय परिसरात बऱ्याच चहाच्या टपऱ्या व नास्ता सेंटर आहे. यातील बऱ्याच दुकानांवर १६ वर्षाखालील मुल राबतांना दिसतात. यातील बरे मुल आर्थिक व शैक्षणिकदृष्या मागास कुटूंबितील व ग्रामीण भागातील आहे. जयस्तंभ चौकातील विविध दुकानांवर असा एक अल्पवयीन मुलगा चहा वाटप करणांना लोकमत चमूला आढळून आला.
पाणी वाटपाची जवाबदारी बालकांकडे!
शहरातील काही चौकात सायंकाळी नास्त सेंटर व फास्टफुटचा गाड्या लावल्या जातात. अन्न शिजविण्यासाठी सायंकाळपुर्वी या गाड्यावर पाणी पोहचविण्याची जवाबदारी काही बालकांवर देण्यात आली आहे. त्यामुळे नजिकच्या बोअरवेल, विहीरी, पाणी विक्री संस्थांकडून तसेस व्यवसायीकांच्या घरून लहानमुल दुकांनावर आॅटोतून पाणी पोहविण्याचे काम करतांना आढळून आले.