कुरूंदकर यांना उत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्कार

By Admin | Updated: April 20, 2015 22:41 IST2015-04-20T22:41:16+5:302015-04-20T22:41:16+5:30

तत्कालीन अपर जिल्हाधिकारी जोशीही सन्मानित.

Kundundar received the Best Collector Award | कुरूंदकर यांना उत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्कार

कुरूंदकर यांना उत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्कार

बुलडाणा : राज्य शासनाच्यावतीने जिल्हास्तरावर उत्कृष्ट कार्य करणार्‍या महसूल अधिकार्‍यांना दिला जाणारा पुरस्कार जिल्हाधिकारी किरण कुरूंदकर यांना जाहीर झाला आहे. सन २0१३-१४ च्या कालावधीत जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या गाळ काढण्याच्या मोहिमेसोबतच टँकरमुक्तीचे जलसंधारण ही संकल्पना प्रत्यक्ष उ तरविण्यामध्ये जिल्हाधिकारी किरण कुरूंदकर यांची प्रमुख भूमिका राहिली आहे. या कार्याची दखल घेऊनच त्यांना उत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यांच्यासोबत तत्कालीन अपर जिल्हाधिकारी चिंतामणी जोशी यांनाही हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

Web Title: Kundundar received the Best Collector Award