Krishi sanjivani Scheme Support of farmers for agricultural revival | कृषी संजीवनीचा शेतकऱ्यांना आधार
कृषी संजीवनीचा शेतकऱ्यांना आधार

 योगेश देऊळकार  
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : शेतीसोबतच पूरक व्यवसायाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीने राबविण्यात येत असलेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा जिल्ह्यातील ६६६ शेतकºयांना लाभ मिळाला आहे. यापोटी १ कोटी ६० लाख ३४ हजार ४५८ रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. सिंचन सुविधांपासून ते गटशेतीपर्यंतचे उपक्रम याअंतर्गत राबविण्यात येऊन शेतकºयांचा आर्थिक स्तर वाढविण्याचा प्रयत्न होत आहे.
सद्य: स्थितीत शेती बेभरवशाची झाली आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे कधी अति तर कधी खूप कमी पाऊस झाल्याने शेतकºयांच्या हातातोंडाशी आलेला घास अनेकदा हिरावून घेतल्या जातो. कसाबसा सावरून बळीराजा दरवर्षी नवीन स्वप्ने पाहून आनंदात पेरणी करीत असतो. मात्र अनेक वेळा पेरणीसाठी लागलेला खर्चही हाती आलेल्या उत्पादनातून निघणे कठीण असते. यामुळे शेतकरी नेहमी आर्थिक विवंचनेत असतो. या परिस्थितीमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आणि शेतकºयांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी शेतीपूरक व्यवसायांना चालना मिळणे गरजेचे आहे. यासाठी शासनाने पुढाकार घेतला असून नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना कार्यान्वीत केली आहे. जिल्ह्यात या योजनेला शेतकºयांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे दिसून येत आहे. याअंतर्गत जिल्ह्यात २०१८ पासून आतापर्यंत ३९६ गावांमधील ६६६ लाभार्थ्यांना १ कोटी ६० लाख ३४ हजार ४५८ रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे.
यामध्ये परसातील कुक्कुटपालन ७, शेततळे १६, ठिबक सिंचन ३०, पीव्हीसी/एचडीपीई पाइप १९२, शेडनेटमधील लागवड साहित्य ६, बिजोत्पादन ४, फळलागवड २, बंदिस्त शेळीपालन २४२, तुषार सिंचन २३, इलेक्ट्रीक मोटार १४१, विहिर पुनर्भरण १ तर शेडनेट या घटकामध्ये २ लाभार्थ्यांचा समावेश आहे.
तालुकानिहाय लाभार्थी गावांची संख्या
नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील ३९६ गावांमधील लाभार्थ्यांना अनुदानाचे वितरण करण्यात आले आहे. यामध्ये बुलडाणा तालुक्यातील १४, चिखली १३, मलकापूर २४, मोताळा २२, जळगाव जामोद ५७, नांदुरा ६९, शेगाव ५९, संग्रामपूर ५८, खामगाव ३०, देऊळगावराजा ६, सिंदखेडराजा १९, मेहकर १० तर लोणार तालुक्यातील १५ गावांचा समावेश आहे.

Web Title: Krishi sanjivani Scheme Support of farmers for agricultural revival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.