मेहकरात होणार सिंधुताई जाधव महाविद्यालयात कोविड केअर सेंटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:34 IST2021-04-27T04:34:57+5:302021-04-27T04:34:57+5:30

खा. प्रतापराव जाधव व आ. संजय रायमुलकर यांच्‍या प्रयत्‍नांतून हे सेंटर उभारण्यात येत आहे. जिल्‍ह्यात सध्‍या कोरोनाने कहर केला ...

Kovid Care Center at Sindhutai Jadhav College to be held in Mehkar | मेहकरात होणार सिंधुताई जाधव महाविद्यालयात कोविड केअर सेंटर

मेहकरात होणार सिंधुताई जाधव महाविद्यालयात कोविड केअर सेंटर

खा. प्रतापराव जाधव व आ. संजय रायमुलकर यांच्‍या प्रयत्‍नांतून हे सेंटर उभारण्यात येत आहे. जिल्‍ह्यात सध्‍या कोरोनाने कहर केला आहे. या अडचणींवर मात करण्‍यासाठी खा.प्रतापराव जाधव यांच्‍या प्रयत्‍नातून मेहकर येथील श्रीमती सिंधुताई जाधव कला व विज्ञान महाविद्यालयाच्‍या वसतिगृहात १०० बेडचे अद्ययावत कोविड केअर सेंटर येत्‍या दोन-तीन दिवसांत सुरू होत आहे. सेंटरमध्‍ये १०० बेड, ३८ प्रसाधनगृह, १० ऑक्सिजन बेड, ३० ते ४० स्‍वतंत्र रुम, डॉक्‍टरांकरीता चार रूम, सर्व रुग्‍ण व नातेवाईकांना भोजन व्‍यवस्‍था, सोबत रुग्‍णांना योग प्रशिक्षण राहणार आहे. २६ एप्रिला याबाबत श्रीमती सिंधूताई जाधव कला व विज्ञान महाविद्यालयात खा.प्रतापराव जाधव यांच्याप्रमुख उपस्थितीत बैठक संपन्‍न झाली. यावेळी आ.संजय रायमुलकर, जिल्‍हाप्रमुख जालिंदर बुधवत, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी राजेंद्र सांगळे, तहसीलदार डॉ.संजय गरकळ, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.महेंद्र सरपाते, न.प. मुख्‍याधिकारी सचिन गाडे, बाजार समिती सभापती माधवराव जाधव, तालुका प्रमुख सुरेश वाळूकर, युवासेना जिल्‍हा युवा अधिकारी ऋषी जाधव, उपनगराध्‍यक्ष जयचंद बाठीया, कार्यकारी संचालक अजय उमाळकर, उपसभापती बबनराव तूपे, नगर सेवक समाधान सास्‍ते, उपतालुका प्रमुख समाधान साबळे, माजी उपशहर प्रमुख मुन्‍ना महाराज दायमा, प्राचार्य डॉ.बी.आर.लाहोरकर, प्राचार्य डॉ.गजानन निकससह महाविद्यालयाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

गरज भासल्‍यास २०० ते ३०० बेड करू : जाधव

सध्‍या १०० बेडचे कोविड केअर सेंटर लवकरच सुरू होत आहे. मात्र, गरज भासल्‍यास २०० बेडचे सेंटर करण्‍यात येईल, अशी माहिती खा. जाधव यांनी दिली तर आ.संजय रायमुलकर यांनी कोविड केअर सेंटरमध्‍ये कुठलीही अडचण येणार नाही याची दक्षता घेतली जाईल तसेच सर्व रुग्‍ण व त्‍यांच्‍या नातेवाईकांना दररोजच्‍या भोजनाची व्‍यवस्‍था आपण करणार असल्‍याचे सांगितले.

Web Title: Kovid Care Center at Sindhutai Jadhav College to be held in Mehkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.