किडनीच्या आजाराने महिलेचा मृत्यू

By Admin | Updated: January 23, 2016 02:09 IST2016-01-23T02:09:51+5:302016-01-23T02:09:51+5:30

संग्रामपूर तालुक्यातील घटना.

Kidney Disease: Death of a Woman | किडनीच्या आजाराने महिलेचा मृत्यू

किडनीच्या आजाराने महिलेचा मृत्यू

संग्रामपूर : तालुक्यातील निवाणा येथील एका २८ वर्षीय महिलेचा किडणीच्या आजाराने मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना शुक्रवारी घडली. मृतक महिलेचे नाव शारदा किशोर बगाडे वय २५ वर्ष असून सदर महिलेला ३ महिन्यापासून किडणीच्या आजाराने ग्रासले होते. सदर महिलेवर बरेच दिवसापासून भुसावळ येथे उपचार सुध्दा करण्यात आले होते. परंतु शुक्रवारी सकाळी सदर महिलेची राहत्या घरी निवाणा येथे प्राणज्योत मालविली. संग्रामपूर तालुका हा खारपाणपट्यात येत असल्यामुळे तालुक्यात किडणीच्या आजाराने मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. या महिलेच्या पश्‍चात पती व मुलगा असा बराच आप्त परिवार आहे.

Web Title: Kidney Disease: Death of a Woman