किडनीच्या आजाराने इसमाचा मृत्यू

By Admin | Updated: January 19, 2017 02:31 IST2017-01-19T02:31:40+5:302017-01-19T02:31:40+5:30

खारपाणपट्टय़ात वरवट बकाल येथील घटना.

Kidney Disease | किडनीच्या आजाराने इसमाचा मृत्यू

किडनीच्या आजाराने इसमाचा मृत्यू

वरवट बकाल, दि. १८- खारपाणपट्टय़ात येत असलेल्या येथील एका इसमाचा किडनीच्या आजाराने १५ जानेवारी रोजी मृत्यू झाल्याची घटना घडली. येथील रहिवासी मुरलीधर खोले (वय ४४) हे गेल्या ८ वर्षांपासून किडनी आजाराने त्रस्त होते. त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याने त्यांच्यावर अकोला येथे दोन वेळा किडनीचे ऑपरेशनसुद्धा करण्यात आले; मात्र भूमिहीन व एका पायाने दिव्यांग असल्याने आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने पुढील उपचार ते करू शकले नाहीत. दरम्यान, १५ जानेवारी रोजी मुरलीधर खोले यांचा किडनी आजाराने मृत्यू झाला. त्यांच्या पश्‍चात पत्नी, तीन मुली, भाऊ असा आप्त परिवार आहे. मृत मुरलीधर खोले हे घरातील कर्ता पुरूष गेल्याने संसार उघड्यावर पडला आहे, तरी शासनाने त्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Kidney Disease