मॅग्मो आयुर्वेद डॉक्टर्सकडून खेडेकर यांचा सत्कार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 00:26 IST2017-10-04T00:25:54+5:302017-10-04T00:26:40+5:30

Khedekar felicitated by Mago Ayurveda doctors | मॅग्मो आयुर्वेद डॉक्टर्सकडून खेडेकर यांचा सत्कार 

मॅग्मो आयुर्वेद डॉक्टर्सकडून खेडेकर यांचा सत्कार 

ठळक मुद्देडॉक्टरांच्या समस्या मार्गी लावल्याबुलडाणा जिल्हा मॅग्मो आयुर्वेद संघटनेच्यावतीने खेडेकर यांचा सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्क
देऊळगाव मही:  डॉक्टरांच्या समस्या मार्गी लावल्यामळे  बुलडाणा जिल्हा मॅग्मो आयुर्वेद संघटनेच्यावतीने आ. डॉ.  शशिकांत खेडेकर यांचा सोमवारी सत्कार करण्यात आला.
आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी विधानसभेत वैद्यकीय  अधिकार्‍यांच्या सेवा नियमित करण्याचा मुद्दा लावून धरला हो ता. नुकताच शासनाने या वैद्यकीय अधिकार्‍यांना सेवेत कायम  करण्याचा कॅबिनेट बैठकीत निर्णय घेतला. त्यामुळे ७३८  बीएएमएस डॉक्टरांना दिलासा मिळाला आहे. शासन दरबारी  सभागृहात तसेच वेळोवेळी आमदार डॉ. खेडेकर डॉक्टर्सच्या  समस्यांचा मुद्दा उपस्थित केला. महाविद्यालयीन जीवनापासून  त्यांनी संघर्ष करून पदवीधारकांना शासन सेवेत मोठे आरक्षण  मिळवून देताना आंदोलनही केले आहे. तेव्हापासून अस्थायी  डॉक्टरांना न्याय मिळावा, यासाठी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत  यांच्याशी  चर्चा करून मार्ग काढण्याबाबत वेळोवेळी पाठपुरावा  केला.  याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Khedekar felicitated by Mago Ayurveda doctors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.