‘खविसं’ने अडविला तुरीचा धनादेश!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 00:54 IST2017-07-31T00:54:07+5:302017-07-31T00:54:12+5:30

संग्रामपूर : तालुक्यातील आवार येथील शेतकरी एकनाथ दुतोंडे यांनी खरेदी विक्री संघाला १५ मे २०१७ रोजी २५ क्विंटल तूर विक्री केली होती. या विक्री केलेल्या तुरीच्या मालाचा १ लाख २६ हजार रुपयांचा धनादेशही खविसंने त्यांना दिला होता.

'Khavisa' blocked the check! | ‘खविसं’ने अडविला तुरीचा धनादेश!

‘खविसं’ने अडविला तुरीचा धनादेश!

ठळक मुद्देशेतक-याने केली सहायक निबंधकांकडे तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्क
संग्रामपूर : तालुक्यातील आवार येथील शेतकरी एकनाथ दुतोंडे यांनी खरेदी विक्री संघाला १५ मे २०१७ रोजी २५ क्विंटल तूर विक्री केली होती. या विक्री केलेल्या तुरीच्या मालाचा १ लाख २६ हजार रुपयांचा धनादेशही खविसंने त्यांना दिला होता. मात्र, खविसंने या शेतकºयाचे पेमेंट स्टॉप केल्यामुळे हा धनादेश बँकेतून परत आला. त्यामुळे याबाबतची तक्रार संबंधित शेतकºयाने सहा. निबंधक सहकारी कार्यालय संग्रामपूर यांच्याकडे २९ जुलै रोजी केली आहे.
दिलेल्या तक्रारीत नमूद आहे, की २५ क्विंटल तूर ही खरेदी विक्री संघाच्या तूर खरेदी केंद्रावर रीतसर बाजार समितीमध्ये आवक रजिस्टरमध्ये नोंद करून व टोकन घेऊन विक्री केली होती.
या विक्री केलेल्या तुरीचा ०१९२७६ क्रमांकाचा १ लाख २६ हजार २५० रुपयांचा धनादेश संग्रामपूर खरेदी विक्री संघाकडून २० जुलै २०१७ रोजीचा बनलेला शेगाव येथील एचडीएफसी बँकेमध्ये जमा केला. त्यानंतर २४ जुलै रोजी हा धनादेश परत आला. सदर शेतकºयाने एचडीएफसी बँकेचा मेमो बघितला असता रिटर्न कोड क्र.(२०) पेमेंट स्टॉप्ड बाय डायव्हर ही बाब उघडकीस आली.
हा धनादेश खरेदी विक्रीने नाहक अडवून फसवणूक केल्याचे या तक्रारीत शेतकरी एकनाथ रामचंद्र दुतोंडे यांनी नमूद केले आहे. या तक्रारीच्या प्रतिलिपी जिल्हाधिकारी बुलडाणा, जिल्हा उपनिबंधक कार्यालय बुलडाणा, सहा. निबंधक जळगाव जामोद यांना पाठविण्यात आल्या आहेत.

ऐन कामाच्या दिवसात शेतकºयांना त्रास
सध्या शेतातील पीक मशागतीचे दिवस सुरु असून, शेतकºयांना पैशांची नितांत गरज भासत आहे. या कामासाठीच शेतकरी तजवीज करुन ठेवत असतात. शेतमालाला भाव नसतानाही नाईलाजाने ते तो विकतात. मात्र, पैसे देताना नाहक त्रास दिला जात असल्याने त्यांच्या अडचणीत वाढ होत आहे.

धनादेशप्रकरणी ‘खविसं’च्या व्यवस्थापकास अहवाल मागितला
संग्रामपूर: तालुक्यातील आवार येथील शेतकºयाने विक्री केलेल्या तुरीपोटी १ लाख २६ हजार रुपयांचा धनादेश खविसंने संबंधित शेतकºयांस दिला होता; मात्र खविसंने या शेतकºयाचे पेमेंट स्टॉप केल्यामुळे हा धनादेश परत आला होता. याबाबत संबंधित शेतकºयाने सहायक निबंधक सहकारी कार्यालय संग्रामपूर यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत सहकार अधिकारी श्रेणी-१ यांनी खविसंच्या व्यवस्थापकास संबंधित शेतकºयाचे पेमेंट का स्टॉप केले, याबाबत अहवाल मागितला आहे. तसे पत्र सहकार अधिकारी श्रेणी-१ यांनी खविसंच्या व्यवस्थापकास २९ जुलै रोजी दिले आहे.
आवार येथील शेतकरी एकनाथ दुतोंडे यांना खरेदी-विक्री संघाचा धनादेशही खविसंने शेतकरी दुतोंडे यांनी दिला होता; मात्र खविसंने या शेतकºयांचे पेमेंट स्टॉप केल्यामुळे हा धनादेश बँकेतून परत आला. त्यामुळे याबाबतची तक्रार २९ जुलै २०१७ रोजी सहायक निबंधक सहकारी कार्यालय संग्रामपूर यांच्याकडे शेतकरी एकनाथ दुतोंडे यांनी केली होती. या तक्रारीची दखल घेत सहकार अधिकारी श्रेणी-१ सहकारी संस्था, तालुका संग्रामपूर यांनी संग्रामपूर तालुका सहकारी खरेदी-विक्री समितीच्या व्यवस्थापकास संबंधित शेतकºयाचे पेमेंट का स्टॉप केले, याबाबत २९ जुलै रोजी अहवाल मागितला.

Web Title: 'Khavisa' blocked the check!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.