शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
2
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
3
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
4
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
5
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
6
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
7
दर्यापुरात टोळक्याचा धुमाकूळ; अमरावती मार्गावर चालत्या वाहनांवर दगडफेक
8
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
9
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
10
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
11
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
12
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
13
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
14
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
15
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
16
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
17
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
18
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
19
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
20
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 

स्वच्छतेसाठी खामगावकरांची नकारघंटा; ‘स्वच्छता अ‍ॅप’ डाऊनलोडींगला थंडप्रतिसाद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 12:37 PM

खामगाव: शहर स्वच्छतेसाठी खामगावकरांचा थंड प्रतिसाद ही मुख्य अडसर ठरत असल्याचे दिसून येते. ‘स्वच्छता’ अ‍ॅप डाऊनलोडींगसाठीही खामगावकरांची नकारघंटा कायम असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देअडीच हजाराचे उद्दीष्ट असताना, आतापर्यंत केवळ ७३० लोकांनीच डाऊनलोड केले ‘स्वच्छता’ अ‍ॅप‘स्वच्छता’ अ‍ॅप मोहिमेच्या जनजागृतीचा एक भाग

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: शहर स्वच्छतेसाठी खामगावकरांचा थंड प्रतिसाद ही मुख्य अडसर ठरत असल्याचे दिसून येते.  ‘स्वच्छता’ अ‍ॅप डाऊनलोडींगसाठीही खामगावकरांची नकारघंटा कायम असल्याचे चित्र आहे.स्वच्छ भारत अभियानाच्या धरतीवर राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानातंर्गत राज्यातील विविध शहरांमध्ये ‘स्वच्छ सर्वेक्षण’ मोहिम राबविण्यात येत असून, या मोहिमेच्या जनजागृतीचा एक भाग असलेल्या ‘स्वच्छता’ अ‍ॅप डाऊनलोडींगला अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते. याबाबत पालिकेकडून जनजागृती करूनही आतापर्यंत ७३०  लोकांनीच हे अ‍ॅप डाऊनलोड केले आहे. अडीच हजाराचे उद्दीष्ट असताना केवळ ७३० लोकांनीच स्वच्छ अ‍ॅप डाऊन लोड केल्याने, खामगावात स्वच्छ महाराष्ट्र अभियान प्रतिसादाच्या अडथळ्यात सापडल्याचे दिसून येते. फेब्रुवारी महिन्यात (क्यूसीआय) समिती तपासणीसाठी येणार आहे. यापार्श्वभूमीवर शहर स्वच्छतेसाठी नगर पालिका प्रशासनाने पाऊले उचलली आहेत. वेगवेगळ्या माध्यमातून स्वच्छता कशी करात येईल, याबाबत प्रयत्न केले जात आहेत. स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये देशातील शहरांनी सहभाग नोंदविला आहे. यामध्ये खामगाव शहर ४१५ व्या स्थानी असून, शहर स्वच्छतेसाठी पालिका प्रशासनासोबतच पालिका पदाधिकाºयांनी पुढाकार घेतला आहे.  याचाच एक भाग म्हणून ‘स्वच्छता अ‍ॅप’ सुरू करण्यात आले आहे.  या अ‍ॅपद्वारे आपल्या परिसरातील तक्रारी पालिकेपर्यंत पोहचविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, या स्वच्छता अ‍ॅपला खामगाव शहरातील नागरिकांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते.अ‍ॅप डाऊनलोडींगसाठी पालिकेची वारी!शहरातील नागरिकांना ‘स्वच्छता अ‍ॅप’ डाऊनलोडींग करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. यासाठी पालिकेच्या एका कर्मचाºयाला प्रत्येकी २०- २५ जणांचे उद्दीष्ट ठरवून देण्यात आले आहे. त्या दृष्टीकोनातून पालिकेच्या विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी व्यापारी गाळे, शाळा- महाविद्यालय आणि घरोघरी भेटी देऊन याबाबत जनजागृती करीत आहेत.खामगावकरांचा थंड प्रतिसाद!खामगाव शहरासाठी सुरूवातीला अ‍ॅप डाऊनलोडींगसाठी अडीच हजाराचे उद्दीष्ट आहे. मात्र, आतापर्यंत प्रत्यक्षात ७३० जणांनीच सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यामध्ये ७०५ अँड्रॉईड मोबाईल धारक असून ०५ जणांकडे (आयओएस) सिस्टीम मोबाईल धारकांचा समावेश आहे. तर सिटी अ‍ॅपला कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून दिसून येते.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानkhamgaonखामगाव