क्रिकेट स्पर्धेत खामगावचा संघ विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:16 IST2021-01-24T04:16:42+5:302021-01-24T04:16:42+5:30

चिखली: ऋषिबाबा क्रिकेट क्लबच्यावतीने आयोजित क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण २२ जानेवारी रोजी पार पडले. या स्पर्धेचा अंतिम सामना गुलजामा, ...

Khamgaon wins cricket tournament | क्रिकेट स्पर्धेत खामगावचा संघ विजयी

क्रिकेट स्पर्धेत खामगावचा संघ विजयी

चिखली: ऋषिबाबा क्रिकेट क्लबच्यावतीने आयोजित क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण २२ जानेवारी रोजी पार पडले. या स्पर्धेचा अंतिम सामना गुलजामा, खामगाव विरूद्ध रेडबॅक संघ, चिखली यांच्यात झाला. अंतिम सामन्यात गुलजामा, खामगाव संघ विजयी ठरला.

रेडबॅक संघ, चिखली यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक स्व. दिनदयाल वाधवाणी फाऊंडेशनचे सर्वेसर्वा अमित वाधवाणी यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी नगरसेवक विलास कंटुले, तुषार बोंद्रे, विजय गाडेकर, उस्मान चौधरी, चेतन देशमुख, योगेश शर्मा, नईमभाई सौदागर, अस्लमभाई मुजावर, रईसभाई पठाण, कैलास शर्मा, पवन शिराळे, सुनील देशमुख, मनोज रूपारेलिया, उद्धव वाघ, शे. सोहिल, दर्शन शर्मा, अदनान खान, कार्तिक जोशी आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास घोलप यांनी केले. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी ऋषिबाबा क्रिकेट क्लब, चिखली, स्व. दिनदयालजी वाधवाणी फाऊंडेशन, चिखली यांनी विशेष परिश्रम घेतले.

Web Title: Khamgaon wins cricket tournament