खामगाव : बोअरचे काम करणारा ट्रक पेटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 16:51 IST2018-09-28T16:50:40+5:302018-09-28T16:51:03+5:30
खामगाव : बोअर खोदणाऱ्या ट्रकने शुक्रवारी दुपारी अचानक पेट घेतला. ही घटना घाटपुरी बायपास जवळील एका वसाहतीत दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली.

खामगाव : बोअरचे काम करणारा ट्रक पेटला
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : बोअर खोदणाऱ्या ट्रकने शुक्रवारी दुपारी अचानक पेट घेतला. ही घटना घाटपुरी बायपास जवळील एका वसाहतीत दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.
राष्ट्रीय महामार्गावरील नवीन वसाहतीत एका खुल्या जागेत बोअर खोदकाम सुरू होते. दरम्यान, बोअरचे खोदकाम करणाऱ्या ट्रकने अचानक पेट घेतला. ट्रक पेटताच चालकासह येथे काम करणाऱ्यां मजूरांनी घटनास्थळ सोडले. तसेच या घटनेमुळे भयभीत झालेले नागरिकही धावत सुटले. वेळी खामगाव येथील अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली. दुपारी ४ वाजेपर्यंत याठिकाणी ३ अग्निशमनच्या गाड्या पाठविण्यात आल्या. आग विझविण्यासाठी अग्नीशमन विभागाचे अमर हट्टेल, संभाजी, राजू जोगदंड, वासुदेव तायडे, दीपक कदम, प्रकाश इंगळे आदींनी प्रयत्न केले.