खामगाव: सेंटरलाईन सोडून रस्त्याची संरचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 01:26 PM2018-12-23T13:26:09+5:302018-12-23T13:26:20+5:30

खामगाव: शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय मार्गाचे रूंदीकरण करताना सेंटरलाईन सोडून रस्त्याची संरचना करण्यात येत असल्याचे दिसून येते.

Khamgaon: The structure of the road leaving the centerline | खामगाव: सेंटरलाईन सोडून रस्त्याची संरचना

खामगाव: सेंटरलाईन सोडून रस्त्याची संरचना

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव: शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय मार्गाचे रूंदीकरण करताना सेंटरलाईन सोडून रस्त्याची संरचना करण्यात येत असल्याचे दिसून येते. राष्ट्रीय प्राधीकरणचे अधिकारी आणि संबंधित कंत्राटदाराच्या संगनमताने हा प्रकार सुरू असल्याने सर्वसामान्यसह या रस्त्यावरील व्यावसायिक नाहक वेठीस धरल्या जात आहेत. या प्रकाराला वेळीस आळा न घातल्यास शहरात जनक्षोभ उसळणार असल्याचे संकेत आहेत. यामुळे शहरातील सामाजिक स्वास्थ धोक्यात येण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

खामगाव शहरातून जात असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या रूंदीकरणाच्या कामास काही दिवसांपूर्वी सुरूवात करण्यात आली. त्याअनुषंगाने बाळापूर फैल भागात रस्त्याच्या दोन्ही बाजूला नाल्यांच्या कामे केली जात आहेत. तसेच मार्कींग केल्यानंतर रस्त्याच्या दुतर्फा असलेली हिरवी झाडंही कापण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे काही ठिकाणी खोदकामही हाती घेण्यात आले आहे. दरम्यान, बाळापूर नाका ते विकमसी चौक आणि विकमसी चौक ते टिळकपुतळा पर्यतचे रस्ता काम करताना, सेंटर लाईन सोडून  या रस्त्याची संरचना करण्यात येत आहे. ही परिस्थिती टिळक पुतळा ते बसस्थानक चौक आणि बस स्थानक चौक ते टावर गार्डन आणि नांदुरारोडपर्यंत कायम आहे. त्यामुळे सामान्यांसह या रस्त्यावरील कायदेशीर गाळे धारक व्यावसायिक आणि शासकीय कार्यालयेही वेठीस धरल्या जाताहेत. सेंटर लाईन सोडून रस्त्याची संरचना करण्यात आल्याने, एका बाजूकडील नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाचे काही अधिकारी  आणि रस्ता काम करणारा कंत्राटदार स्वहितासाठी रस्त्याच्या संरचनेत बदल करीत असल्याची सामान्यांची ओरड होत आहे.

अतिक्रमण काढताना भेदभाव!

राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरण करताना अतिक्रमण हटवितानाही भेदभाव केल्या जात आहे. काही अतिक्रमकांना लाभ पोहोचविण्यासाठी कायदेशीर दुकानदार, शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना वेठीस धरल्या जात आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिकृत गाळे धारक तसेच कृउबास नजीक असलेल्या खामगाव अर्बन बँकेलाही नाहक वेठीस धरले जात आहे.

कामाच्या दर्जाकडे दुर्लक्ष!

रस्त्याच्या चौपदरीकरणातंर्गत बाळापूर नाका परिसरात रस्त्याच्या दुतर्फा नाल्यांचे बांधकाम केले जात आहे. तसेच रूंदीकरणासाठी खोदकाम आणि मार्कीगही केली जात आहे. खोदकाम केल्यानंतर काम अर्धवट सोडण्यात येत असून, सुरक्षीततेच्या दृष्टीकोनातूनही कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. तसेच नाली बांधकामाच्या क्राँकीटकरणाला अपुरेपाणी दिले जात असल्याचे दिसून येते.


 

 

दोन पदरी असलेल्या रस्त्याचे आता चौपदरीकरण करण्यात येत आहे.  त्यामुळे दोन पदरी असलेल्या रस्त्याचे चौपदरीकरण करताना सेंटरलाईन चेंज होणे स्वाभाविक आहे.  काम करताना येणारे अडसर दूर करीत कामाला गती देण्याचा प्रयत्न आहे. महामार्गासाठी अधिग्रहीत जागेतच रस्ता रूंदीकरण करण्यात येत असल्याने, कुणाचेही नुकसान करण्याचा प्रयत्न नाही. तरी देखील कंत्राटदाराकडून भेदभाव होत असेल तर चौकशी केली जाईल.

- विलास ब्राम्हणकर, संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरण

Web Title: Khamgaon: The structure of the road leaving the centerline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.