शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

खामगावातील भूखंड घोटाळा: आणखी तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 11:34 AM

Khamgaon Crime News भूखंड घोटाळ्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात  बुधवारी सकाळी आणखी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : खामगाव शहरातील कोट्यवधी रुपयांच्या भूखंड घोटाळ्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात  बुधवारी सकाळी आणखी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी आतापर्यंत १७ आरोपींना शहर पोलिसांनी अटक केली असून, बुधवारी अटक करण्यात आलेल्या तीनपैकी एकास जालना जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आले आहे. त्यामुळे खामगाव येथील भूखंड घोटाळ्याचे लोण दूरवर पसरल्याचे दिसून येते.खामगाव भाग-१ चा तत्कालीन तलाठी राजेश चोपडे याने त्याच्या कार्यकाळात मूळ हस्तलिखित ७/१२ मध्ये बनावट नोंदी केल्या. या बनावट नोंदी करून त्या आधारे संगणकीकृत ७/१२ तयार केलेत. याद्वारे खामगाव उपविभागातील ९४ पेक्षा अधिक सातबाऱ्यांची मालकी बदलवून दुसऱ्यांच्या नावावर खरेदी करून देणाऱ्या  वरिष्ठांचीही दिशाभूल केली. याप्रकरणी खामगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये  गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, गतवर्षी डिसेंबरअखेरीस १४ आरोपींना अटक करण्यात आली.  बुधवारी आणखी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये दोन आरोपींना चिखली तालुक्यातील कोलारा येथून अटक करण्यात आली आहे, तर एकास डोलखेडा, ता. जाफ्राबाद, जि. जालना येथून अटक केली आहे. खामगाव शहर पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर, एएसआय रमजान चौधरी, एनपीसी दिनकर वानखडे, मोनिका किलोलिया यांनी अटक केली.

आतापर्यंत अटक करण्यात आलेले आरोपी! भूखंड घोटाळ्यात आतापर्यंत शहर पोलिसांनी मुख्य सूत्रधार राजेश ज्ञानदेव चोपडे (५१), रा. रॅलीज प्लॉट खामगाव, ललित शेषराव झाडोकार (४०), स्वप्नील शेषराव झाडोकार (३७), दोघेही रा. संजीवनी कॉलनी, खामगाव, लक्ष्मण प्रल्हाद फाळके (६४), रा. टाकळी हाट, ता. शेगाव, देवीदास किसन राजनकर (६९), मुकिंदा हरीश्चंद्र उमाळे (५०), समाधान शंकर वाघ (७०), तिघेही रा. पातुर्डा खुर्द, ता. संग्रामपूर,  रमेश वासुदेव राऊत (४५),  रा. पारखेड, ता. खामगाव, प्रभाकर मुकदन पिसे (४९), रा. पाडसूळ, ता. शेगाव, शैलेश श्रीकृष्ण चोपडे (२९), रा. वृंदावननगर, वाडी, ता. खामगाव, गोपाळराव पांडुरंग तायडे (८५), रा. हिंगणा निंबा, ता. बाळापूर, जि. अकोला, गुलाबराव हरिभाऊ क्षीरसागर (७०), रा. रोहीणखेड, ता. मोताळा, जि. बुलडाणा, दिलीप रामकृष्ण लोखंडे (५९), सुरेश रामकृष्ण लोखंडे (५०), दोघेही रा. हिंगणी बु., ता. तेल्हारा, जि. अकोला, रमेश रामभाऊ गवई (५०), भीमराव उत्तम मघाडे (४९), दोघेही रा. कोलारा, ता. चिखली आणि डिगंबर देवराव भांबळे (६०),  रा. डोलखेडा, ता. जाफ्राबाद, जि. जालना, अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावCrime Newsगुन्हेगारी