खामगाव : कांदाचाळ लाभार्थ्यांसह कृषी सहाय्यकांना नोटीस!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 20:44 IST2018-01-22T20:38:57+5:302018-01-22T20:44:10+5:30
खामगाव: शासनाकडून कांदाचाळीचे वितरण करण्यात आल्यानंतर काही लाभार्थ्यांनी कांदाचाळीच्या उद्देशाला हरताळ फासल्याचे गत आठवड्यात उघडकीस आले. पडताळणीत दोषी आढळलेल्या ३७ शेतक-यांना कृषी विभागाकडून नोटीस बजावण्यात आल्या. सोबतच संबधीत कृषी सहाय्यकांनाही नोटीस बजावण्यात आल्याने कृषी विभागात खळबळ उडाली आहे.

खामगाव : कांदाचाळ लाभार्थ्यांसह कृषी सहाय्यकांना नोटीस!
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: शासनाकडून कांदाचाळीचे वितरण करण्यात आल्यानंतर काही लाभार्थ्यांनी कांदाचाळीच्या उद्देशाला हरताळ फासल्याचे गत आठवड्यात उघडकीस आले. पडताळणीत दोषी आढळलेल्या ३७ शेतक-यांना कृषी विभागाकडून नोटीस बजावण्यात आल्या. सोबतच संबधीत कृषी सहाय्यकांनाही नोटीस बजावण्यात आल्याने कृषी विभागात खळबळ उडाली आहे. ‘कांदाचाळीच्या उद्देशाला हरताळ!’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने १५ जानेवारी रोजी वृत्त प्रकाशित केले होते, हे येथे उल्लेखनिय!
कांदा उत्पादक शेतक-यांचे कांदा साठवणुकीतील नुकसान कमी करण्यासाठी तसेच शास्त्रोक्त पध्दतीने कांदा साठवणूक करण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतंर्गत कांदा उत्पादक शेतक-यांना अनुदानावर कांदाचाळीचे वितरण करण्यात येत आहे. मात्र, या कांदाचाळीच्या अनुदानाचा जिल्ह्यात दुरूपयोग करण्यात आल्याचे अनेक धक्कादायक प्रकार उघडकीस आले. याबाबत कृषी विभागाकडे तक्रारी प्राप्त झाल्यानंतर कृषी विभागाकडून सन २०१६-१७ या आर्थिक वर्षांमध्ये मंजूर झालेल्या कांदाचाळींची जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पडताळणी कृषी विभागामार्फत कृषी पर्यवेक्षकाद्वारे करण्यात आली. यामध्ये ३७ पैकी ६ ठिकाणी कांदाचाळ आढळून आली नाही. तर ३१ ठिकाणी नियोजीत जागेऐवजी कांदाचाळ दुसºया ठिकाणी हलविल्याचे कृषी पर्यवेक्षकांना आढळून आले. जिल्ह्यातील ३५ कृषी पर्यवेक्षकांकडून करण्यात आलेल्या पडताळणीचा अहवाल वरिष्ठ स्तरावर सादर करण्यात आला. त्यानंतर कृषि विभागाकडून संबधीत ३७ शेतकºयांना कारणेदाखवा नोटीस बजावण्यात आली. सोबतच संबधीत कृषी सहाय्यकांनाही कृषी विभागाकडून नोटीस बजावण्यात आल्या आहेत. परिणामी, कृषी विभागात खळबळ उडाली आहे.
कृषी सहाय्यक वेठीस!
खामगाव तालुक्यात २३४ लाभार्थ्यांना गत आर्थिक वर्षांत कांदाचाळ वितरीत करण्यात आल्या होत्या. दरम्यान, अनुदान वितरीत करण्यात आल्यानंतर काही लाभार्थ्यांनी या कांदाचाळीच्या उद्देशालाच हरताळ फासल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. प्रत्यक्ष शहनिशा करण्यासाठी कृषी विभागाकडून कृषी सहाय्यकाद्वारे पडताळणी करण्यात आली. यामध्ये अनेक ठिकाणी घोळ आढळून आल्याचे उघडकीस आले. लाभार्थ्यांनी केलेल्या घोळाला कृषी सहाय्यकांना जबाबदार धरण्यात येत असल्याने, आता याप्रकरणी कृषी सहायकही वेठीस धरल्या जात असल्याचे दिसून येते.
कांदाचाळीचे सापळे गायब!
कांदाचाळीचे अनुदान वितरीत झाल्यानंतर कृषी विभागाकडून करण्यात आलेल्या पडताळीत अनेक ठिकाणी लाभार्थ्यांच्या शेतातील कांदाचाळीचे सापळे गायब असल्याचे निदर्शनास आल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला. चार ते सहा ठिकाणी कांदाचाळीची उभारणीच करण्यात आली नसल्याचेही उघडकीस आले. तर काही लाभार्थ्यांनी सापळे इतरत्र हलविल्याचे दिसून आले.
भाड्याच्या सापळ्यांचा वापर!
कांदाचाळीसाठी भाड्याच्या सापळ्यांचा वापर करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकारही कृषी विभागाच्या पडताळणीत उघडकीस आला. अनुदान मिळाल्यानंतर लाभार्थ्यांनी कांदाचाळीचे सापळे इतरत्र हलविण्यासोबतच भाड्याचे सापळे (स्ट्रक्चर) परत केल्याची चर्चा आहे. दरम्यान, पडताळणीनंतर कृषी विभागाची नोटीस मिळाल्याने परत केलेले सापळे लाभार्थ्यांनी पुन्हा जैसे थे! अवस्थेत ठेवल्याची चर्चा कृषी वर्तुळात आहे.
कांदाचाळींची पडताळणी करण्यात आल्यानंतर दुरूपयोग करणाºया संबधीत लाभार्थ्यांसह कृषी सहाय्यकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. नोटीस बजावण्यात आलेल्या अनेक लाभार्थ्यांनी आपल्या शेतात कांदाचाळीची पुर्नउभारणी केली आहे. सर्वच लाभार्थ्यांनी दुरूपयोग केल्याचे म्हणता येणार नाही.
- प्रमोद लहाळे
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, बुलडाणा.