खामगाव पालिका मैदानावर ओल्या पाटर्य़ा !

By Admin | Updated: December 7, 2015 02:18 IST2015-12-07T02:18:20+5:302015-12-07T02:18:20+5:30

ऐन थंडीत खुल्या मैदानांसह सार्वजनिक ठिकाणांचा दुरूपयोग.

Khamgaon Municipality ground on the wetlands! | खामगाव पालिका मैदानावर ओल्या पाटर्य़ा !

खामगाव पालिका मैदानावर ओल्या पाटर्य़ा !

खामगाव : नगरपालिका परिसराला लागूनच असलेल्या पालिकेच्या मैदानावर काही तरूण रात्रीच्या सुमारास ओल्या पाटर्य़ा करून सार्वजनिक जागेचा सर्रास दुरुपयोग करीत असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. त्यामुळे पहाटेच्या सुमारास या मार्गाने फिरायला जाणार्‍या तसेच व्यायाम करायला जाणार्‍या नागरिकांना त्रास होत आहे; मात्र या प्रकाराकडे शहर पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. शहरातील सार्वजनिक ठिकाणांसह मैदान आणि निर्जन गल्लीबोळीत युवकांसह नागरिक मोठय़ा संख्येत धूम्रपान करतात तसेच देशी-विदेशी दारूही पितात. पाण्याच्या, दारूच्या रिकाम्या बाटल्या, बिडी, सिगारेटचे पॉकिट, सिगारेट व चखण्यासाठी आणलेले पदार्थ तेथेच फेकून देतात. सदर प्रकार या मैदानावर अनेक दिवसांपासून हो त आहे; मात्र या प्रकाराकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. सार्वजनिक ठिकाणांचा दुरुपयोग करणे हा कायद्याने गुन्हा असला आहे; मात्र, अशाही परिस्थितीत शहरात मोठय़ा प्रमाणावर दारूची उलाढाल होत असल्याने मैदानावरही मोठय़ा प्रमाणावर ओल्या पाटर्या होत आहेत. त्यामुळे यावर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. नागरिकांना सहन करावा लागतो त्रास सध्या हिवाळ्याचे दिवस असल्याने अनेक नागरिक सकाळी तसेच सायंकाळी मैदानावर फिरायला येतात. तसेच काही तरुण येथे व्यायामही करतात; परंतु येथे काही दिवसांपासून रात्रीच्या सुमारास काही बिघडलेले तरूण ओल्या पाटर्या करीत असल्याने सकाळी या मैदानावर व्यायाम करताना नागरिकांना उग्रवासाचा सामना करावा लागतो तसेच या मैदानावर सकाळी आणि दुपारच्या वेळेस खेळणार्‍यांनाही येथे पडलेल्या काचांचा त्रास होतो.

Web Title: Khamgaon Municipality ground on the wetlands!