खामगाव नगरपालिकेत मुख्याधिकारी रोडे रूजू

By Admin | Updated: June 22, 2016 00:06 IST2016-06-22T00:06:32+5:302016-06-22T00:06:32+5:30

खामगाव नगरपालिकेला प्रतीक्षेनंतर मिळाले मुख्याधिकारी.

Khamgaon Municipal Corporation's Chief Officer Rode Ruju | खामगाव नगरपालिकेत मुख्याधिकारी रोडे रूजू

खामगाव नगरपालिकेत मुख्याधिकारी रोडे रूजू

खामगाव (जि. बुलडाणा): येथील नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पदाची प्रतीक्षा अखेर संपली असून, मंगळवारी नवनियुक्त मुख्याधिकारी म्हणून प्रशांत रोडे यांनी पदभार स्वीकारला आहे.
नगरपालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी डी.ई.नामवाड यांचे एका कथीत मूर्ती विटंबनाप्रकरणी निलंबन करण्यात आले. त्यानंतर खामगाव नगरपालिकेचा प्रभार नांदुरा नगरपालिकेचे मुख्याधिकारी डी.आर.बोरीकर यांच्याकडे सोपविण्यात आला; मात्र त्यांनी प्रभार सांभाळण्यास असर्मथता दर्शविल्यानंतर, चिखली नगरपालिकेचे मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण यांच्याकडे प्रभार देण्यात आला. दरम्यान, शनिवारी उस्मानाबाद नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत रोडे यांनी खामगाव येथील रिक्तपदावर बदली करण्यात आली. त्यानंतर मंगळवारी त्यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला आहे. रोडे यांच्या नियुक्तीमुळे खामगाव नगरपालिकेला दीर्घ प्रतीक्षेनंतर कायम स्वरूपी मुख्याधिकारी मिळाला आहे. दरम्यान, नवीन मुख्याधिकार्‍यांकडून खामगाव शहरातील नागरिकांना मोठय़ा अपेक्षा आहेत. सुमारे तीन-चार महिन्यांचा कालावधी मुख्याधिकारी नसल्याने शहरातील अनेक विकास कामे खोळंबलेली आहे. ही कामे मार्गी लागावी, अशी अपेक्षा आहे.

Web Title: Khamgaon Municipal Corporation's Chief Officer Rode Ruju

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.