खामगाव : मिनीट्रक उलटला; एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 17:43 IST2018-06-18T17:43:02+5:302018-06-18T17:43:02+5:30
खामगाव : मजूर घेवून जाणारा मिनीट्रक उलटल्याने एक जण जागीच ठार झाला. ही घटना सोमवारी सकाळी ७.३० वाजता दरम्यान पिं.राजा कासारखेड रोडवर घडली.

खामगाव : मिनीट्रक उलटला; एक ठार
ठळक मुद्दे भालेगाव बाजार येथील मिनीट्रक क्र.एम.एच.०४ एफ ९३८२ मजूर घेवून पिं.राजा कडे जात होते. दरम्यान चालकाचे नियंत्रण सुटल्याने सदर मिनीट्रक उलटला. या अपघातात हुसैन शहा दावल शहा (वय २८) हा जागीचठार झाला
खामगाव : मजूर घेवून जाणारा मिनीट्रक उलटल्याने एक जण जागीच ठार झाला. ही घटना सोमवारी सकाळी ७.३० वाजता दरम्यान पिं.राजा कासारखेड रोडवर घडली. भालेगाव बाजार येथील मिनीट्रक क्र.एम.एच.०४ एफ ९३८२ मजूर घेवून पिं.राजा कडे जात होते. दरम्यान चालकाचे नियंत्रण सुटल्याने सदर मिनीट्रक उलटला. या अपघातात हुसैन शहा दावल शहा (वय २८) हा जागीचठार झाला. तर पाच जण किरकोळ जखमी झाले. याप्रकरणी मृतकचा भाऊ याच्या तक्रारीवरुन पिं.राजा पोलिसांनी मिनीट्रक चालक तौफीक खान अहमद खान यांच्याविरुध्द कलम ३०४, (अ), २७९,३३७,३३८ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.