खामगांव: गारडगाव येथील शेतमजुराची आजाराला कंटाळून आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 12:54 IST2018-02-09T12:52:53+5:302018-02-09T12:54:26+5:30
खामगांव: तालुक्यातील गारडगाव येथील ४० वर्षीय इसमाने राहत्या घरात गळफास लावून आत्म्यहत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी ९ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली.

खामगांव: गारडगाव येथील शेतमजुराची आजाराला कंटाळून आत्महत्या
खामगांव: तालुक्यातील गारडगाव येथील ४० वर्षीय इसमाने राहत्या घरात गळफास लावून आत्म्यहत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी ९ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली.
गारडगाव येथील विलास राजाराम खेडकर (४०) या इसमाने ८ फेब्रुवारी रोजीच्या रात्री घराच्या पंख्याला दोराच्या साहाय्याने गळफास लावून आत्म्यहत्या केली. पायाला गंभीर जखम असल्याने त्या वेदनेने अत्यंत त्रस्त होता त्याकडे पायाच्या उपचारासाठी जवळ रक्कम नसल्याने त्याने आत्महत्या केल्याचे सुत्राचे म्हनने आहे. विलास हा मजुरी करायचा तर वडीलांचा व्यवसाय शेती होता. त्यांच्या पश्चात पत्नी, आई वडील व ३ भाऊ असा आप्त परिवार आहे.
खामगांव ग्रामीण पोलिस स्टेशनला आकस्मिक मृत्यू ची नोंद करण्यात आली आहे.