शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव: भरधाव लक्झरीच्या धडकेत पती-पत्नी ठार, मुलगा जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 23:09 IST

Khamgaon Accident भरधाव लक्झरीच्या धडकेत पती-पत्नी ठार, मुलगा जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव: भरधाव लक्झरीच्या धडकेत पती-पत्नी ठार तर एक आठ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला. ही घटना खामगाव-शेगाव रोडवरील श्यामल नगर जवळ  शनिवारी रात्री ९: २० वाजता घडली.   खामगाव येथील चांदमारी चौकातील विजय दत्तात्रय सारस्कर(४०) त्यांची पत्नी सुलोचना आणि आठ वर्षीय मुलगा सुपेश याच्यासोबत   एमएच २८ एफ- ८१८८ या दुचाकीने श्यामलनगरकडे जात होते. दरम्यान, शेगाव येथून खामगावकडे  एमएच ३० एए-९९९५ याक्रमांकाची लक्झरी येत होती. यावेळी लक्झरीच्या चालकाने आपले वाहन निष्काळजीपणे चालवित दुचाकीला जबर धडक दिली. धडकेनंतर दुचाकी सुमारे २०-२५ फूट दूर अंतरापर्यंत फरफटत नेली. यात विजय सारस्कर जागीच ठार झाले. त्यांच्या पत्नी सुलोचना यांना सामान्य रूग्णालयात आणत असताना वाटेतच मृत्यू झाला. तर दुचाकीवरील सुपेश सारस्कर(०८) हा गंभीर जखमी झाला. जखमी सुपेशवर खामगाव येथील सामान्य रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताची माहिती मिळताच शहर पोलिस स्टेशनचे निरिक्षक सुनिल अंबुलकर घटनास्थळी दाखल झाले. तत्पूर्वी नगरसेवक किशोरआप्पा भोसले, नगरसेविका शीतल माळवंदे, प्रितम माळवंदे, उत्तम माने, अतुल झरेकर आणि चांदमारीतील युवक घटनास्थळी पोहोचले.

डुक्कर आडवे आल्याने तिघे जखमी

भाऊ  आणि वहिणीचा अपघात झाल्याची माहिती मिळताच विजय सुपेकर यांचे बंधू अविनाश सारस्कर(४२) आपल्या धीरज आणि नक्ष या दोन मुलांसह घटनास्थळाकडे घाई गडबडीत हिरानगर येथून निघाले. रस्त्याने येत असताना हनुमान व्हिटामीनजवळ त्यांच्या दुचाकी समोर डुक्कर आडवे आले. त्यामुळे दुचाकी घसरून झालेल्या अपघातात अविनाश सुपेकर आणि त्यांची दोन्ही मुलं जखमी झाली. त्यांच्या खामगाव येथील सामान्य रूग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना सुटी देण्यात आली.

टॅग्स :khamgaonखामगावAccidentअपघात