शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून किरण सामंतांचा दावा
2
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
3
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
4
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
5
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
6
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
7
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
8
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
9
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
10
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
11
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
12
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
13
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
14
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
15
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
16
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
17
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
18
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
19
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
20
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट

खामगाव : बोहल्यावर चढण्यापूर्वीच वधूने केले पलायन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 1:15 AM

खामगाव : लग्न ठरल्यानंतर सोने खरेदीसाठी शहरात आलेली वधू नियोजित वराला रस्त्यात सोडून मावस भावासोबत दुचाकीने रफुचक्कर झाल्याची घटना समोर आली आहे. पैशाच्या व्यवहारातून हा संबंध झाला होता. खान्देशातील युवकाच्या फसवणुकीचा हा प्रकार शहरातील चांदमारी भागात घडला.

ठळक मुद्देखान्देशातील वराची खामगावात फसवणूक 

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : लग्न ठरल्यानंतर सोने खरेदीसाठी शहरात आलेली वधू नियोजित वराला रस्त्यात सोडून मावस भावासोबत दुचाकीने रफुचक्कर झाल्याची घटना समोर आली आहे. पैशाच्या व्यवहारातून हा संबंध झाला होता. खान्देशातील युवकाच्या फसवणुकीचा हा प्रकार शहरातील चांदमारी भागात घडला.याबाबत बापू सुकलाल पाटील (वय ३0) रा. भातखेड ता. एरंडोल ह.मु. लोणी ता. पारोळा जि.जळगाव खान्देश याने दिलेल्या तक्रारीनुसार, त्याला एजंट नितीन भगवान साळुंके (रा. बुलडाणा) याने २३ डिसेंबर रोजी शेगाव येथे दोन मुली दाखविल्या. त्यापैकी अर्पिता डोंगरे (रा. अकोला) ही मुलगी पसंत आली. पाहणीचा कार्यक्रम आटोपला त्याच दिवशी  नितीन साळुंके याचा त्यांना फोन आला व त्याने अर्पिता ही तिच्या काकाकडे राहते. तिच्या लग्नासाठी त्यांना ७0 हजार व लग्न कार्याचा खर्च म्हणून ३0 हजार द्यावे लागतील, असे सांगितले. यावेळी बापु याने ८५ हजार रुपये देण्याचे कबूल केले. यानंतर लगेच त्याने २६ डिसेंबर ही लग्नाची तारीख ठरविली. ठरल्याप्रमाणे बापू त्याचे जावई, दोन बहिणी, आई, वडील हे लग्नासाठी खामगावला आले. त्यांच्या परिचयाच्या चांदमारी भागातील देवीदास प्रल्हाद इंगळे यांच्या घरी २६ डिसेंबर रोजी सकाळी साक्षगंधाचा कार्यक्रम आटोपला. यानंतर कोर्ट मॅरेज संबंधीचे प्रतिज्ञापत्र लिहून देण्यात आले. यानंतर वधू अर्पिताचा मावसभाऊ तेथे आला व तो सोने घेण्यासाठी वधू-वरांना घेऊन दुचाकीने बाजारात गेला. तेथे बतावणी करून बापूला टिळक पुतळ्य़ाजवळ उतरवून अर्पितासह त्याने पलायन केले. या प्रकरणात पोलिसांनी नितीन साळुंके आणि वधू अर्पिता, तिचा मावसभाऊ, तिची मोठी बहिणीसह एका विरोधात गुन्हा दाखल केला.

टॅग्स :khamgaonखामगाव