खामगाव : निवडणुकीत काँग्रेसचा नंबर वनचा दावा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 01:11 IST2017-10-10T01:11:25+5:302017-10-10T01:11:30+5:30

८ जागेवर भाजप, तर ४ ठिकाणी अपक्ष उमेदवारांचा दावा  खामगाव: थेट सरपंच निवडीच्या निवडणूक निकालात खामगाव  मतदारसंघातील एकूण २३ जागेपैकी ११ जागेवर काँग्रेस व  भारिप, ८ जागेवर भाजप  तर ४ ठिकाणी अपक्ष उमेदवार  विजयी झाल्याचा दावा काँग्रेस पक्षाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात  केला आहे. 

Khamgaon: Congress's number one claim in elections! | खामगाव : निवडणुकीत काँग्रेसचा नंबर वनचा दावा!

खामगाव : निवडणुकीत काँग्रेसचा नंबर वनचा दावा!

ठळक मुद्दे२३ जागेपैकी ११ जागेवर काँग्रेस व भारिपचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : ८ जागेवर भाजप, तर ४ ठिकाणी अपक्ष उमेदवारांचा दावा  खामगाव: थेट सरपंच निवडीच्या निवडणूक निकालात खामगाव  मतदारसंघातील एकूण २३ जागेपैकी ११ जागेवर काँग्रेस व  भारिप, ८ जागेवर भाजप  तर ४ ठिकाणी अपक्ष उमेदवार  विजयी झाल्याचा दावा काँग्रेस पक्षाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात  केला आहे. 
निवडणुकीच्या निकालानंतर कवडगाव येथील काँग्रेस प्रणित  कविता उत्तम राठोड, लोखंडा येथील काँग्रेस व भारिप वंदना  आनंद गवई, जळका तेली येथील वैशाली दळभंजन तर वडजी  येथील निरंजन वाघ आणि सजनपुरी येथील उमेदवार सरपंचपदी  विजयी झाले. तर शेगाव तालुक्यातील खामगाव मतदारसंघातील  ७ पैकी ४ जागेवर काँग्रेस पक्षाचे उमेदवार सरपंचपदी निवडून  आले. यामध्ये चिंचखेड येथील उषा विठ्ठल भांबेरे, माटरगाव  खुर्द येथील .शारदा सिद्धेश्‍वर बोंबटकार,सगोडा येथील  भास्करराव पाटील,कठोरा येथील सुषमा जितेंद्र खवले या  नवनियुक्त सरपंच व ग्राम पंचायत सदस्यांचा   जनसंपर्क  कार्यालय येथे माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी  ितरंगा दुपट्टा व पुष्पहार देऊन सत्कार केला. माजी आमदार राणा  दिलीपकुमार  सानंदा म्हणाले की, यंदा थेट निवडणुकीमुळे सर पंच पदाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. ग्रामस्थांनी ज्या  विश्‍वासाने काँग्रेस व मित्रपक्षाला सेवा करण्याची संधी दिली  आहे. त्या विश्‍वासाला सार्थ ठरवित गावाच्या प्रगतीचा संकल्प  घ्यावा. गावामधील समस्या मार्गी लावून गावाची प्रगती साधावी. 
याप्रसंगी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. सदानंद धनोकार,  कृउबास संचालक प्रमोद चिंचोळकार, जि.प.चे माजी सभापती  सुरेश वनारे,पं.स.सदस्य मनीष देशमुख, पं.स.सदस्य इनायत  उल्ला खॉं, अजय तायडे, विजय काटोले,तुशार चंदेल  यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठया सं ख्येने उपस्थित होते.

Web Title: Khamgaon: Congress's number one claim in elections!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.