खामगाव आगाराकडून वारकरी, विद्यार्थी वेठीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 03:45 PM2019-07-09T15:45:56+5:302019-07-09T15:46:38+5:30

वारकरी आणि विद्यार्थ्यांच्या तक्रारींसोबतच एसटी कर्मचाऱ्यांनी देखील आगारातील गलथान कारभाराचा पाढा वाचला.

Khamgaon bus depot; Warkari, students | खामगाव आगाराकडून वारकरी, विद्यार्थी वेठीस

खामगाव आगाराकडून वारकरी, विद्यार्थी वेठीस

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : स्थानिक बसस्थानकावर वारकरी आणि विद्यार्थ्यांना वेठीस धरल्याच्या तक्रारी वाढीस लागल्यानंतर सोमवारी आ. आकाश फुंडकर, तहसिलदार शितल रसाळ आणि शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक संतोष टाले यांनी बसस्थानकात धडक दिली. यावेळी वारकरी आणि विद्यार्थ्यांच्या तक्रारींसोबतच एसटी कर्मचाऱ्यांनी देखील आगारातील गलथान कारभाराचा पाढा वाचला. त्यामुळे आगार व्यवस्थापक आर. आर. फुलपगारे यांना चांगलेच धारेवर धरण्यात आले.
खामगाव आगाराच्या ढिसाळ नियोजनामुळे शालेय विद्यार्थी आणि सामान्य प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. सोमवारी तीन तास प्रतीक्षा करूनही पंढरपूर बस न लागल्यामुळे वारकरी संतप्त झाले. त्यांनी ही बाब आ.आकाश फुंडकर यांच्यासह स्थानिक प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. त्याचवेळी सोमवारी ग्रामीण भागातील अनेक फेºया रद्द करण्यात आल्याची तक्रार ही विद्यार्थ्यांनी केली. त्यामुळे बसस्थानकात तात्कळत असलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या तक्रारींचा पाढा उपस्थितांसमोर वाचला.
भरीस भर म्हणून काही कर्मचाºयांनी देखील आगार व्यवस्थापकांच्या तक्रारीची री ओढली. त्यामुळे यापुढे तक्रारी प्राप्त झाल्यास योग्य ती कारवाई करण्याचा इशारा आ.आकाश फुंडकर यांनी दिला. तसेच प्रशासनाकडूनही योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश स्थानक प्रमुख आणि आगार प्रमुखांना देण्यात आले. यावेळी विद्यार्थी, वारकरी संतप्त झाल्याने बसस्थानकातील वातावरण चांगलेच तापले होते. यासंदर्भात अधिक माहितीसाठी आगार व्यवस्थापक आर.आर. फुलपगारे यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होवू शकला नाही.


तात्काळ सुटल्या बस
आगार व्यवस्थापकांची कान उघडणी करण्यात आल्यानंतर खामगाव आगारातून पंढरपुरसाठी तात्काळ बस सोडण्यात आली. त्याचवेळी ग्रामीण भागातही काही बसेस सोडण्यात आल्या. मात्र कोंटी, श्रीधरनगरकडे जाणाºया प्रवाशांची संख्या अधिक असल्याने विद्यार्थ्यांना टपावरून प्रवास करावा लागला.

Web Title: Khamgaon bus depot; Warkari, students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.