बुलढाणा: अज्ञात वाहनाची धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यू
By अनिल गवई | Updated: March 3, 2023 17:43 IST2023-03-03T17:42:06+5:302023-03-03T17:43:11+5:30
या घटनेमुळे बाळापूर फैल भागात एकच शोककळा पसरली आहे.

बुलढाणा: अज्ञात वाहनाची धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यू
खामगाव: अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी खामगाव अकोला रस्त्यावरील कोलोरी फाट्यावर घडली. गौतम लक्ष्मण पवार, रा. बाळापूर फैल असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे.
खामगाव-अकोला रस्त्यावरील कोलोरीनजीक अज्ञात वाहनाच्या धडकेने दुभाजकावर दुचाकी आदळल्याने इसमाचा अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतकास खामगाव येथील सामान्य रुग्णालयात आणण्यात आले. दुचाकीला जबर धडक दिल्यानंतर अज्ञात चालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला. त्यानंतर ही घटना काही वेळाने रस्त्याने ये-जा करणाऱ्याच्या निदर्शनास आली. त्यानंतर येथे पोलिसांना पाचारण करण्यात आले. या घटनेमुळे बाळापूर फैल भागात एकच शोककळा पसरली आहे.