शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

बाजारभाव स्थिर, मात्र आवक घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 12:05 IST

Khamgaon APMC News : कृषी उत्पन्न बाजार समिती खामगाव येथे येणाऱ्या मालाची आवक घटली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: मागील दोन आठवड्यांतील शेतमालाचे बाजारभाव हे स्थिर आहेत. मात्र लाॅकडाऊन जाहीर करण्यात आल्याने कृषी उत्पन्न बाजार समिती खामगाव येथे येणाऱ्या मालाची आवक घटली आहे.     खामगाव कृषी उत्पन्न बाजार समिती जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजार समिती आहे. येथे केवळ खामगाव तालुकाच नाही तर मेहकरपासून जळगाव जामोदपर्यंतचे शेतमाल विक्रीसाठी आणतात. यावषीर् कोरोनाच्या दुसर्या लाटेनंतर लागलेल्या लाॅकडाऊनमध्ये केवळ खामगाव तालुक्यातील शेतमालच खरेदी करण्याचे आदेश दिल्याने आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. शनिवारी व रविवारी दोन दिवक केवळ भुइमुगाची खरेदी करण्यात आली. भुइमुगाची पेरणीच कमी प्रमाणात असल्याने आवकही कमीच आहे. मागील वर्षी कोराेनाने  हाहाकार माजविला. देशभरात लाॅकडाऊन जाहीर करण्यात आले होते. याच कोरोनाच्या  दुसऱ्या लाटेचा या वर्षीसुद्धा फटका बसला आहे.  शेतमाल विक्रीसह शेतकऱ्यांना फळ विक्री व भाजीपाला विक्री करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. अनेक ठिकाणी तर फळे व भाजीपाला शेतकऱ्यांना कवडीमोल भावात विकावा लागत आहे. शेतकऱ्यांनी वर्षभर मेहनत करून शेतात शेतमाल पिकविला त्या शेतमालाला पाहिजे त्या प्रमाणात बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी तो माल विक्री  करण्याची घाई केली नाही. शेतकरी बाजारभाव वाढतील या आशेवर थांबले होते. सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिळत असलेले बाजारभाव  काही प्रमाणात  स्थिर आहेत. सोयाबिनच्या भावात गत काही दिवसांपूवी वाढ झाली. मात्र सध्या शेतकर्यांकडे सोयाबिन नसून, व्यापार्यांकडेच साठवूण ठेवलेला आहे. त्यामुळे थोड्या प्रमाणात सोयाबिनची आवक होत आहे. शेतमाल गावातून शहरात आणण्यातही अनेक अडचणी येत असल्याने शेतकरी शेतमाल घरीच ठेऊन आहे. 

शासनाकडून दरवर्षी शेतमालाचे हमीभाव जाहीर करण्यात येतात. मात्र व्यापारी त्या हमीभावापेक्षा कमी दरात शेतमाल खरेदी केला जात असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.हमी भावानेच शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी हाेण्याची गरज आहे.  - रामेश्वर गिर्हे, शेतकरी,  

शेतकऱ्याने वर्षभर मेहनत करून शेतमाल पिकविला. मात्र उत्पादन खर्च हा उत्पन्नापेक्षा अधिक असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. पाहिजे त्या प्रमाणात बाजारभाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यावर आर्थिक संकट ओढवले  आहे. - गजानन तायडे , शेतकरी,  

टॅग्स :khamgaonखामगावAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती