खामगाव येथील कृषी कार्यालयात सुटीच्या दिवशी महिलेशी छेडछाड!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 16:44 IST2018-08-29T16:41:50+5:302018-08-29T16:44:22+5:30
खामगाव: सुटीच्या दिवशी कार्यालयात कुणी नसल्याची संधी साधत दोन चतुर्थश्रेणी कर्मचाºयांनी एका महिलेशी छेडछाड केली.

खामगाव येथील कृषी कार्यालयात सुटीच्या दिवशी महिलेशी छेडछाड!
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: सुटीच्या दिवशी कार्यालयात कुणी नसल्याची संधी साधत दोन चतुर्थश्रेणी कर्मचाºयांनी एका महिलेशी छेडछाड केली. विभागीय कृषी अधिकारी कार्यालयात शनिवारी सायंकाळी हा प्रकार घडला. याप्रकाराबाबत वरिष्ठांनी कानावर हात ठेवले असून, प्रकरण मिटविण्यासाठी महिलेवर दबाव आणल्या जात असल्याची माहिती आहे.
खामगाव येथील प्रशासकीय इमारतीत दुसºया माळ्यावर प्रशासकीय कार्यालय आहे. या कार्यालयात शनिवारी एक महिला आली. या महिलेची तेथे उपस्थित असलेल्या दोन चतुर्थश्रेणी कर्मचाºयांनी छेड काढली. पुढील अनर्थ घडण्यापूर्वीच या महिलेने आरडा-ओरड करत, तेथून पळ काढला. तत्पूर्वी छेड काढणाºया दोघांना संबंधीत महिलेने ‘प्रसाद’ही दिला. या प्रकरणाची गेल्या दोन दिवसांपासून दबक्या आवाजात चर्चा प्रशासकीय कार्यालयात असून, कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाºयांनी संबंधितांना समज दिला. यापुढे असे कृत्य केल्यास परिणामांना सामोरे जाण्यास तयार राहण्याचा इशाराही दिला. तथापि, महिलेसंबधीत प्रकरण असल्यामुळे सुटीच्या दिवशी आपण कुणालाही कार्यालयात कर्तव्यावर हजर राहण्याच्या सूचना दिली नव्हती. त्यामुळे आपली तक्रार असल्यास पोलिसांत करा, अशा सूचना वरिष्ठ अधिकाºयांनी संबंधीत महिलेला दिल्या. परंतू, सदर महिलेवर चतुर्थश्रेणी कर्मचाºयांकडून दबाव आणल्या जात असल्याचे समजते. याप्रकारामुळे उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी उपविभागीय कृषी अधिकाºयांनी संपर्क साधला असता, त्यांनी प्रकाराला दुजोरा दिला. मात्र, यासंदर्भात अधिक माहिती देण्याचे टाळले.