खामगावात रमजान ईद उत्साहात
By Admin | Updated: July 29, 2014 23:45 IST2014-07-29T23:45:18+5:302014-07-29T23:45:18+5:30
सुख व शांतीसाठी मुस्लिम बांधवांनी मागितली दुवा

खामगावात रमजान ईद उत्साहात
खामगाव : शहरातील मुस्लीम बांधबांनी मोठय़ा उत्साहात ईद साजरी केली. सकाळी १0 वाजता परिसरातील सजनपुरी येथील ईदगाहवर ईद उल फितर ची नमाज पडण्यात आली. या आधी शहरातील विविध मस्जिदमध्ये ही नमाज पडण्यात आली.
मुस्लिम समुदायाचा सगळ्य़ात महत्वाचा सण म्हणून ईदकडे पाहिले जाते. पवित्र रमजान महिन्यानंतर ईद साजरी करण्यात येते. आज २९ जुलै रोजी इद साजरी करण्यात आली. रात्री पासूनच मुस्लीम बांधव ईदच्या तयारीला लागले होते. सकाळी ईद चे गुसल स्नान केल्यानंतर नमाज पडण्यात आली व या यानंतर सर्व मुस्लीम बांधव नवे कपडे घालून सामूहीक नमाद अदा करण्यासाठी ईदगाह येथे एकत्र आले. ईदगाहवर जाण्याअगोदर कच्छीयान मस्जिद, हरीफैेल मस्जिद, कालनी मस्जिद व शहरातील अन्य मस्जिदमध्ये ईदची नमाज पडण्यात आली.
ईजची नमाज फाटकपुरा मस्जिद चे इमाम हाफिज सरफराज खान यांनी पठण केली. ९.४५ वाजता इमाम हाफिज सरफराज खान यांनी नमाज पठण करण्याची शास्त्रोक्त माहिती दिली. सकाळी ठिक १0 वाजता नमाज सुरु झाली. नमाज पठन झाल्यानंतर इमाम हाफिज सरफराज खान यांनी खुतबा दिला आणि इस्लामच्या भलाईसाठी सुख, शांतीसाठी दुआ मागीतली. जगामध्ये सुख व शांती नांदावी यासाठी ही दुवा मागण्यात आली. दुवा झाल्यानंतर सगळ्या मुस्लीम बांधवांनी एक- दुसर्यांची गळाभेट घेऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. ईदगाह परिसरात लहान मुलांच्या खेळण्याच्या दुकांनावर साहित्य खरेदीसाठी मुलांनी गर्दी केली होती. अनेक मुस्लीम बांधव ईदगाहच्या नंतर कब्रस्थानमध्ये गेले व तेथे जाऊन आपल्या नातेवाईकांसाठीही दुवा मागितली. यानंतर एक दुसर्यांच्या घरी जाऊन ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या.