खामगावात भाजपला झुकते माप!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 01:12 IST2017-10-10T01:12:01+5:302017-10-10T01:12:24+5:30
खामगाव: तालुक्यातील १६ पैकी एका ग्रामपंचायतीवर निवडणुकीपूर्वीच अविरोध सत्ता काबिज केल्यानंतर सोमवारी जाहीर झालेल्या निकालात भारतीय जनता पक्षाने ९ ग्रामपंचाय तीवर दावा ठोकला. त्यामुळे खामगाव तालुक्यात भाजपला झुकते माप मिळाल्याचे चित्र आहे. दरम्यान, जाहीर झालेल्या जागांवरील सरपंच पदावरून दोन्ही प्रमुख राजकीय पक्षांमध्ये टकरावही झाला. तथापि, या टकरावानंतरही भाजपच वरचढ असल्याचे दिसून आले.

खामगावात भाजपला झुकते माप!
अनिल गवई ।
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: तालुक्यातील १६ पैकी एका ग्रामपंचायतीवर निवडणुकीपूर्वीच अविरोध सत्ता काबिज केल्यानंतर सोमवारी जाहीर झालेल्या निकालात भारतीय जनता पक्षाने ९ ग्रामपंचाय तीवर दावा ठोकला. त्यामुळे खामगाव तालुक्यात भाजपला झुकते माप मिळाल्याचे चित्र आहे. दरम्यान, जाहीर झालेल्या जागांवरील सरपंच पदावरून दोन्ही प्रमुख राजकीय पक्षांमध्ये टकरावही झाला. तथापि, या टकरावानंतरही भाजपच वरचढ असल्याचे दिसून आले.
खामगाव तालुक्यात १६ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रीया पार पडली. या निवडणूक प्रक्रीयेतील अंतिम टप्पा असलेल्या मतमोजणीत सोमवारी खामगाव तालुक्यात अनेक महत्वपूर्ण घडामोडी घडल्या. १६ पैकी कोंटी ग्रामपंचायतीवर भाजपने सर पंचपदासह सहा सदस्य अविरोध निवडून आणले. त्यानंतर सोमवारी मतमोजणी दरम्यान, १६ पैकी ९ ठिकाणी भाजप सम िर्थत सरपंच पदाचे उमेदवार आणि पॅनलमधील सदस्य विजयी झाले. तर दोन ठिकाणी भाजपचे पॅनल विजयी झाले तर, सरपंच पदी अपक्ष उमेदवार विजयी झाले. त्यामुळे या ठिकाणी भाजप- काँग्रेसमध्ये टकराव झाल्याचे दिसून आले. तर कवडगाव ग्राम पंचायतीमध्ये भाजप सर्मथक उमेदवार विजयी झाला मात्र, विजयाची माळ गळ्यात पडताच कवडगावच्या सरपंचानी ‘जनसंपर्क’चा रस्ता धरला. काँग्रेसकडून त्यांचा सत्कारही झाला. मतदार संघातील विकास कामांना मतदारांनी कौल दिल्याची भूमिका खामगाव मतदार संघाचे आमदार आकाश फुंडकर यांनी मांडली. त्याचवेळी मतदार संघात सन २0१४ पासून सुरू असलेली परिवर्तनाची लाट कायम असल्याचे दिसून आले. काँग्रेसने नंबरवनचा दावा केला असला तरी, कवडगाव, सजनपुरी, वडजीभेंडी, जळका तेली या ठिकाणीच यश मिळाले. तर लोखंडा येथे भारिपच्या मदतीने काँग्रेसला सत्ताकाबीज करता आली. तथापि, जळका तेली येथील सरपंच पदाचे उमेदवार काँग्रेसच्या तंबूतून भाजपकडे सामिल झाल्याने, खामगाव मतदार संघात भाजपची सरशी झाल्याचे दिसून येते.