किनगाव जट्टू येथे वृक्षांनाच बांधल्या राख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:36 IST2021-08-23T04:36:28+5:302021-08-23T04:36:28+5:30

येथील श्रावणी गणेश सातपुते व वेदिका केशव सातपुते या दोघी बहिणींनी २२ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या दिवशी सामाजिक बांधीलकी जपत ...

Keep the trees tied at Kingaon Jattu | किनगाव जट्टू येथे वृक्षांनाच बांधल्या राख्या

किनगाव जट्टू येथे वृक्षांनाच बांधल्या राख्या

येथील श्रावणी गणेश सातपुते व वेदिका केशव सातपुते या दोघी बहिणींनी २२ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या दिवशी सामाजिक बांधीलकी जपत त्यांनी आपल्या घरासमोरील झाडांना कुमकुम टिळक लावून राखी बांधली. कोरोनाच्या काळातील ऑक्सिजनचा तुटवडा पाहता त्यांनी झाडाबद्दल कृतज्ञता दाखविली. या माध्यमातून त्यांनी सर्वांना ‘झाडे लावा झाडे जगवा’ हा संदेश दिला. दरम्यान, वृक्षाबाबत शेकडो वर्षांपूर्वी संत तुकाराम महाराजांनीसुद्धा त्यांच्या एका अभंगातून वृक्षाचे महत्त्व पटवून देताना ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ असे सांगितले होते.

Web Title: Keep the trees tied at Kingaon Jattu